Advertisement

दसरा, दिवाळीनंतर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता - राजेश टोपे

नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्याता वर्तवली आहे.

दसरा, दिवाळीनंतर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता - राजेश टोपे
SHARES

मुंबईसह राज्यभरात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून रुग्णसंख्येतही घट होत आहे. त्यामुळं राज्य सरकारनं नियमांमध्ये शिथिलता आणत अनेक सुविधा सुरू केल्या. सद्यस्थितीत नवरात्रीच्या मुहुर्तावर राज्यातील सर्व प्रार्थनास्थळ खूली केली. विद्यार्थ्यांसाठी शाळा व कॉलेज सुरू करण्यात आली. त्यामुळं नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळच आहे. मात्र, असं असलं तरी नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्याता वर्तवली आहे. दसरा, दिवाळीनंतर तिसऱ्या लाटेची शक्यता आहे, असा इशारा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सकाळी मुंबईतील महालक्ष्मी मंदिरात जाऊन अंबेमातेचं दर्शन घेतलं. त्यानंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना एका नव्या मोहिमेची घोषणा केली. राज्यात ८ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबरपर्यंत 'मिशन कवच कुंडल' (Mission Kavach Kundal) मोहिम राबवण्यात येणार आहे. यात १५ ऑक्टोबरपर्यंत वेगानं कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे.

राज्यात कुठेही लस कमी पडणार नाही अशी काळजी या कालावधीत घेतली जाईल असा विश्वास टोपे यांनी यावेळी व्यक्त केला आहे. राज्यात शुक्रवारपासून दररोज १५ लाख लसीकरण करण्यात येणार आहे आणि यासाठी आपल्याकडे सध्या १ कोटी लसी उपलब्ध आहेत, अशी माहिती राजेश टोपे यांनी यावेळी दिली.

दसरा (Dussehra) आणि दिवाळीनंतर (Diwali) तिसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवरच आपण विशेष लसीकरण मोहीम राबवत आहोत. जेणेकरुन आरोग्यावर गंभीर परिणाम होणार नाहीत. कारण लसीकरण हाच मोठा पर्याय आपल्याकडे आहे, असं राजेश टोपेंनी म्हटलं.

मुस्लिम बांधव देखील आता बऱ्यापैकी लसीकरण करुन घेत आहेत. मात्र मालेगावसारख्या ठिकाणी अद्यापही लसीकरण हवं तसं झालेलं नाही. त्या ठिकाणी धर्मगुरू, मौलवी आणि सामाजिक संस्थांचं सहकार्य घेऊन लसीकरण केलं जाणार असल्याचं टोपे यांनी यावेळी सांगितलं आहे. 


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा