Advertisement

अखेर डॉक्टर 'ऑन ड्युटी'


अखेर डॉक्टर 'ऑन ड्युटी'
SHARES

मुंबई - संप मागे घेतल्यानंतर अखेर सहाव्या दिवशी निवासी डॉक्टर कामावर रुजू झालेत. शुक्रवारी रात्रीपासूनच केईएम, जेजे रुग्णालयातील डॉक्टर कामावर रुजू झाले आहेत. शनिवारी आठ वाजेपर्यंत सर्व डॉक्टर कामावर रुजू होतील असे आश्वासन मार्डने दिले होते. त्यानुसार आठपर्यंत सर्व डॉक्टर्स कामावर रुजू झाले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मार्ड यांच्यात शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत मार्डच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक नेमण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेत असल्याचे मार्डने जाहीर केले.

गेले पाच दिवस निवासी डॉक्टरांचा संप सुरू होता. संपामुळे रुग्णाचे हाल झाले. संपा दरम्यान तीन दिवसात 135 रुग्णांना उपचाराअभावी प्राण गमवावे लागले. 

शुक्रवारी विधानसभेत मुख्यमंत्र्यांनीही डॉक्टरांच्या संपावर संताप व्यक्त केला होता. सुरक्षेचे आश्वासन देऊनही संप मागे घेत नसल्याने मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती. हायकोर्टानेही डॉक्टरांच्या आडमुठ्या भूमिकेवरून मार्डला फटकारले होते. जे डॉक्टर कामावर हजर राहणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे आदेश हायकोर्टाने दिले होते.

आणखी वाचा -

डॉक्टरांचा संप मिटला पण प्रश्न कायम?

https://www.mumbailive.com/mr/focus/are-doctors-really-safe-9528

प्रत्येक रुग्णालयात पोलीस चौकी

https://www.mumbailive.com/mr/city/only-87-doctors-resume-duty-in-bmc-hospitals-9536


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा