Advertisement

'दोन करोडचं केलं काय ?'


SHARES

विक्रोळी - पालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाची अक्षरश: दुरवस्था झालीय. कुठे स्लॅब कोसळतोय तर कुठे छप्पर. दोन करोड रूपये खर्च करूनही हीच परिस्थिती. त्यात आता दुरुस्तीच्या नावाखाली प्रशासनाने हे रुग्णालय दुसरीकडे स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतलाय. या स्थलांतराविरोधात स्थानिकांनी रूग्णालयासमोर मूक धरणे आंदोलन केले. त्याच बरोबर स्वाक्षरी मोहीमही राबवली.

स्थानिक विश्वास निकम यांनी पालिकेने दोन करोड रुपयाचे नेमके काय केले असा प्रश्न उपस्थित केलाय. तसेच या परिसरात एक खासगी रुग्णालय उभारण्यात येणार आहे. जर हे रुग्णालय बंद झाले तर खासगी रुग्णालयाला फायदा होईल असा प्रशासनाचा डाव असल्याचा आरोपही विश्वास निकम यांनी केलाय. तर "या परिसरात हे एकमेव रुग्णालय आहे. हेही स्थलांतरित झाले तर रुग्णांना लांब जावे लागेल. त्यामुळे याच रुग्णालयाची दुरुस्ती करावी," अशी मागणी स्थानिक मेहरूनिसा शेख यांनी केली. मात्र पालिका अधिकाऱ्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. दुरुस्तीच्या कामासाठी रुग्णालय स्थलांतरित करण्यात येत आहे, असे स्पष्टीकरण वैद्यकीय अधिकारी जितेंद्र जाधव यांनी दिले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा