गेल्या पाच वर्षांत मुंबईच्या (mumbai) सायन हॉस्पिटलमध्ये (sion hospital) 43,412 मातांनी आईचे दूध (breast milk) दान केले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (bmc) ने ऑगस्टमधील राष्ट्रीय स्तनपान महिन्यामध्ये मिळवलेल्या माहितीनुसार 10,523 नवजात बालकांना यामुळे मदत झाली आहे.
निओनॅटॉलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. जयश्री मोंडकर यांनी 1989 मध्ये या मिल्क बँकेची (milk bank) स्थापना केली. ती आशियातील पहिली ब्रेस्ट मिल्क बँक होती. सायन हॉस्पिटलमधील नवजात अतिदक्षता विभाग (NICU) दरवर्षी कमी वजनाच्या आणि प्रकृती नाजुक असलेल्या बाळांना दूध पुरवते.
हॉस्पिटलमध्ये दरवर्षी जन्माला येणाऱ्या 10,000 ते 12,000 बाळांपैकी सुमारे 1,500 ते 2,000 बाळांना या ब्रेस्ट मिल्क बँकेकडून दूध मिळते.
रक्तदानाप्रमाणेच नवजात बालकांचे प्राण वाचवण्यासाठी आईच्या दूधाचे दान महत्त्वाचे आहे. हे कमी वजनाच्या आणि प्रकृती नाजुक असलेल्या अर्भकांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी करते. यामुळे जन्मत: कमी वजन, अपुरी वाढ, आणि ज्यांच्या मातांना जन्मानंतरच्या समस्यांचा सामना करावा लागतो अशा बालकांना फायदा होतो.
दान केलेले आईचे दूध रक्तदानाप्रमाणेच हाताळले जाते. स्तनपान करणाऱ्या माता हाताने जास्तीचे दूध गोळा करतात. हे दूध नंतर जन्मदात्या आईशी जैविक दृष्ट्या संबंधित नसलेल्या बाळांना दिले जाते. गोळा केलेल्या आईच्या दुधाची चाचणी केली जाते. हे दुध दूषित आढळल्यास दुधाची विल्हेवाट लावली जाते. सुरक्षित दूध -20 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमानात साठवले जाते.
सायन (sion) रुग्णालयाची प्रेरणा घेऊन इतर राज्ये आणि महाराष्ट्रातील रुग्णालये ब्रेस्ट मिल्क बँकांची स्थापना करत आहेत. गेल्या पाच वर्षांत 51,214 मातांना दूध दानाबद्दल समुपदेशन मिळाले आहे. त्यापैकी 43,412 जणांनी सुमारे 4,184 लिटर दूध दान केले.
सायन हॉस्पिटल हे पश्चिम भारताचे विभागीय संदर्भ केंद्र म्हणून काम करते. हे महाराष्ट्र, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, दमण आणि दीवमधील मिल्क बँकांवर देखरेख करते. सार्वजनिक आणि खाजगी आरोग्य सेवा संस्थांमध्ये इतर ब्रेस्ट मिल्क बँक उघडण्यासाठी रुग्णालय मदत करते.
माता दूध दान करायचे असल्यास रुग्णालयाशी 022-2406-3157 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.
हेही वाचा