Advertisement

'मुंबईत भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट'


'मुंबईत भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट'
SHARES

मुंबई - दाक्षिणात्य अभिनेत्री पारुल यादववर काही दिवसांपूर्वी काही भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. अंधेरीतल्या एका अपार्टमेंटमध्ये राहणारी पारुल तिच्या प्लुटो नावाच्या कुत्र्याला फिरवण्यासाठी घराबाहेर पडली. तेवढ्यात तिच्यावर काही भटके कुत्रे झेपावले. आपल्या कुत्र्याला वाचवण्यासाठी पारुलने प्लुटोला उचलून घेतलं. पण, चार-पाच कुत्र्यांनी पारुलवर असा काही हल्ला केला की तिला डोक्यावर आणि हातावर जखमा झाल्या. लगेचच आसपासच्या स्थानिकांनी पारुल आणि प्लूटोला या कुत्र्यांच्या तावडीतून सोडवलं. पण, हल्ल्यात पारुलच्या हातासह डोक्याला जखम झाली असून तिच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली. दरम्यान मुंबईत भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढल्याचे पेटाने देखील कबूल केलं असून, कुत्र्यांची नसबंदी केल्यास धोका टळू शकेल अशी प्रतिक्रिया पेटाचे कार्यकर्ते सचिन बंगेरा यांनी दिली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा