एड्स सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली

 Chembur
एड्स सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली
एड्स सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली
See all

चेंबूर - एड्स बाबत जनजागृती करण्यासाठी चेंबूरमधील अनेक महाविद्यालयीन तरुणांनी रविवारी चेंबूर परिसरात जनजागृती रॅली काढली. यात चेंबूरच्या एन.जी.आचार्य आणि दा.कृ.मराठे महाविद्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, नारायण गुरु महाविद्यालय, स्वामी विवेकानंद महाविद्यालय आणि महात्मा नाईट महाविद्यालय या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. एड्स नियंत्रण संदर्भात जोरदार घोषणा देत विद्यार्थ्यांनी शताब्दी रुग्णालयापासून चेंबूर मुक्तीनगर, घाटला गाव आणि खारदेवनगर अशी ही रॅली काढली होती. याशिवाय काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करुन उपस्थितांना एड्सवर मात करण्याचा संदेश दिला.

Loading Comments