Advertisement

दिलासादायक! 'त्या' १ हजार प्रवाशांचा शोध घेण्यात महापालिकेला यश


दिलासादायक! 'त्या' १ हजार प्रवाशांचा शोध घेण्यात महापालिकेला यश
SHARES

ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हायरस जन्माला आला आहे. या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनानं नागरिकांच्या सुरक्षेसाठी कंबर कसली आहे. ब्रिटनमधून गेल्या महिनाभरात मुंबईत दाखल झालेल्या सुमारे १ हजार नागरिकांचा शोध घेण्यात पालिकेला यश आले आहे. या सर्वाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून या नागरिकांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून न आल्याने पालिकेने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

आणखी काही नागरिकांचा शोध पालिका घेत आहे. ब्रिटनहून भारतात येणारी विमान सेवा बंद करण्यात आली आहे. मात्र गेल्या महिनाभरात म्हणजे २५ नोव्हेंबरनंतर ब्रिटनहून सुमारे १५९३ प्रवासी मुंबईत आले असून त्यांची यादी विमानतळ प्राधिकरणाकडून पालिकेला उपलब्ध झाली आहे. या यादीच्या आधारे पालिकेने प्रवाशांचा शोध सुरू केला आहे.

१ हजार प्रवाशांचा शोध घेण्यात पालिका यशस्वी झाली असून या प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. तपासणीदरम्यान प्रवाशांना कोरोनाची लक्षणे आहेत का याची खातरजमा करण्यात येत आहे. मात्र वैद्यकीय तपासणी केलेल्या प्रवाशांमध्ये तूर्तास तरी एकालाही लक्षणे नसल्याचे आढळले आहे. त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

ब्रिटनहून आलेल्या नागरिकांना कोरोनाच्या नव्या संसर्गाची बाधा झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे महिनाभरापूर्वी तेथून आलेल्या सर्वाचा शोध घेण्यात येत आहे. एखाद्याला बाधा झाली असेल, तर त्याच्यामुळे अन्य नागरिकांना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही शोधमोहीम युद्धपातळीवर हाती घेण्यात आली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा