
महिलांमध्ये वाढत्या हार्मोनल समस्यांच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात (Thane) पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डिसीज (PCOD) साठी विशेष क्लिनिकची सुरुवात करण्यात आली आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या पुढाकारातून राज्यभर सुरू करण्यात येणाऱ्या या उपक्रमांतर्गत बुधवारी, 6 मे 2026 रोजी ठाण्यात या क्लिनिकचे उद्घाटन करण्यात आले.
ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या सिव्हिल सर्जन यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी अतिरिक्त सिव्हिल सर्जन आणि निवासी वैद्यकीय अधिकारी यांनी PCOD व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले.
तसेच स्त्रीरोग तज्ज्ञ आणि वरिष्ठ परिचारिकांनी महिलांना लवकर निदान आणि उपचाराचे महत्त्व समजावून सांगितले.
उद्घाटनानंतर क्लिनिकमध्ये तात्काळ सेवा सुरू करण्यात आली. रुग्णांची तपासणी, आवश्यक औषधोपचार आणि समुपदेशनही करण्यात आले. महिलांना विशेष हार्मोनल आरोग्य सेवा सहज उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा उपक्रम मानला जात आहे.
हे क्लिनिक दर बुधवारी ‘मेनोपॉज OPD’ सोबत कार्यरत राहणार असून, PCOD व्यवस्थापनासाठी सर्वसमावेशक सेवा दिल्या जाणार आहेत. यामध्ये तज्ज्ञ स्त्रीरोग तपासणी, आवश्यक पॅथॉलॉजिकल चाचण्या, वैद्यकीय उपचारांसह समुपदेशन, मानसिक आरोग्य सहाय्य तसेच आहार आणि जीवनशैलीविषयक मार्गदर्शनाचा समावेश असेल.
हेही वाचा
