Advertisement

ऑक्सफर्डच्या कोरोना लसीच्या मानवी परिक्षणासाठी मुंबई-पुण्यातील स्वयंसेवक

कोरोनावर ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अॅस्ट्राजेनेकानं लस तयार केली आहे. या लसीची भारतात ऑगस्टपासून ट्रायल (परिक्षण) सुरू होणार आहे.

ऑक्सफर्डच्या कोरोना लसीच्या मानवी परिक्षणासाठी  मुंबई-पुण्यातील स्वयंसेवक
SHARES

कोरोनावर ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अॅस्ट्राजेनेकानं लस तयार केली आहे. या लसीची भारतात ऑगस्टपासून ट्रायल (परिक्षण) सुरू होणार आहे. या परिक्षणासाठी मुंबई आणि पुण्यातील कोरोनाच्या हॉटस्पॉटमधून ४ हजार ते ५ हजार स्वयंसेवकांची निवड करण्यात आली आहे. हे परीक्षण यशस्वी झाल्यास पुढील वर्षी जूनपर्यंत ही लस बाजारात आणली जाईल, असं सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने म्हटलं आहे.

 या लसीचे यशस्वी परिणाम ऑक्सफर्ड विद्यापीठाला दिसून आले आहेत. त्यामुळे ब्रिटनमध्ये ही लस रुग्णांसाठी वापरली जात आहे. भारतातही ही लस येणार आहे. मात्र, भारतात आधी या लसीचं मानवी परिक्षण केलं जाणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट या लसीचं परीक्षण करणार आहे.  मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये राज्यातील अर्ध्याहून अधिक कोरोना रुग्ण आहेत. त्यामुळे मुंबई आणि पुण्यात या लसीचं मानवी परीक्षण करण्यात येणार आहे. या दोन शहरात कोरोनाचे सर्वाधिक हॉटस्पॉट आहेत. त्यामुळे या लसीचे परिणाम जाणून घेण्यास अधिक मदत होईल, असं सिरमचे सीईओ अदार पूनावाला यांनी सांगितलं.

केंद्र सरकारच्या औषध महानियंत्रकांची परवानगी मिळाल्यानंतर कोरोनावरील या लसीच्या फेज-३ चं परिक्षण सुरू करण्यात येईल.  एक दोन आठवड्यात यासाठी परवानगी मिळेल अशी आशा आहे. त्यानंतर तीन आठवडे व्हेंटिलेटर्स रुग्णालयात आणायला लागतील.  एक ते दीड महिन्यात ही ट्रायल सुरू होईल, असं पुनावाला यांनी सांगितलं.


हेही वाचा -

राज्यात ९८९५ कोरोना रुग्णांची दिवसभरात नोंद, पाहा तुमच्या भागातील रुग्णांची संख्या किती

मुंबईत कोरोनाचे १२५७ नवे रुग्ण, ५५ जणांचा दिवसभरात मृत्यूसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा