Advertisement

कुर्ला इमारत दुर्घटना: कंत्राटदाराला अटक, मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधानांकडून आर्थिक मदत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला

कुर्ला इमारत दुर्घटना:  कंत्राटदाराला अटक, मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधानांकडून आर्थिक मदत
SHARES

कुर्ला येथील नाईकनगर परिसरातील चार मजली इमारत दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

मृत आणि जखमींमध्ये बहुतांश मजूर, चौकीदार आणि शिंपी यांचा समावेश आहे. पोलिसांनी एका कंत्राटदाराला अटक केली आहे, दिलीप विश्वास, ज्याने इमारतीची स्थिती माहीत असूनही घरे भाड्याने दिली होती, त्याला एफआयआर दाखल केल्यानंतर 24 तासांच्या आत अटक करण्यात आली.

या घटनेनंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आणि नातेवाईकांसाठी पंतप्रधान मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये मदत जाहीर केली.

मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुर्ला येथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले आहे. जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचेही निर्देश दिले आहेत.

एकनाथ शिंदे गट आणि आमदार मंगेळ कुडाळकरांकडून मृतांना पाच लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. या घटनेमुळे आपल्याला दु:ख झाल्याची प्रतिक्रिया आमदार मंगेश कुडाळकर यांनी दिली आहे.

मुंबईतील कुर्ला येथील नाईकनगर परिसरातील चार मजली इमारत सोमवारी रात्री 11.30 च्या सुमारास कोसळली. या ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची शक्यता आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या ठिकाणच्या ढिगाऱ्यामधून अनेकांना वाचवण्यात यश आलं आहे. जखमी लोकांवर राजावाडी रुग्णालय आणि सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी यांनी मध्यरात्रीच्या सुमारास घटनास्थळी भेट दिली. जखमी झालेल्या लोकांवर जवळच्या रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत.



हेही वाचा

कुर्ला इमारत दुर्घटना: १९ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची मदत जाहीर

गोरेगावमधील शाळेत मध्यरात्री घुसला बिबट्या, शाळा आज बंद

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा