Advertisement

कुर्ला इमारत दुर्घटना: १९ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची मदत जाहीर

आणखी काहीजण या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे.

कुर्ला इमारत दुर्घटना: १९ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची मदत जाहीर
SHARES

मुंबईतील कुर्ला येथील नाईकनगर परिसरातील चार मजली इमारत दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. आणखी काहीजण या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. पालिका, अग्निशमन दल आणि एनडीआरएफ पथकाच्या वतीनं या ठिकाणी बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुर्ला येथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले आहे. जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचेही निर्देश दिले आहेत.

मुंबईतील कुर्ला येथील नाईकनगर परिसरातील चार मजली इमारत सोमवारी रात्री 11.30 च्या सुमारास कोसळली. या ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची शक्यता आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या ठिकाणच्या ढिगाऱ्यामधून अनेकांना वाचवण्यात यश आलं आहे. जखमी लोकांवर राजावाडी रुग्णालय आणि सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी यांनी मध्यरात्रीच्या सुमारास घटनास्थळी भेट दिली. जखमी झालेल्या लोकांवर जवळच्या रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत.

बंडखोर नेते एकनाथ शिंदे गट आणि आमदार मंगेळ कुडाळकरांकडून मृतांना पाच लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. या घटनेमुळे आपल्याला दु:ख झाल्याची प्रतिक्रिया आमदार मंगेश कुडाळकर यांनी दिली आहे.

मुंबई महानगरपालिकेकडून नोटीस देण्यात आली होती. असं असतानाही त्या ठिकाणी आठ ते दहा कुटुंबं राहत असल्याची माहिती आहे. या वास्तव्य करणारे रहिवासी भाडेकरू आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी बचाव कार्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबई महापालिकेने नोटीस बजावलेल्या इमारतींमध्ये वास्तव्य करू नये असे आवाहन करण्यात येत आहे.



हेही वाचा

कुर्ला इमारत दुर्घटना : सरकारच्या आधी एकनाथ शिंदेंचा मदतीचा हात, 'इतक्या' भरपाईची घोषणा!

Mumbai Rain: बेस्ट बसच्या मार्गात बदल, ट्राफिक ते लोकल ट्रेन संदर्भात सर्व माहिती एका क्लिकवर">Mumbai Rain: बेस्ट बसच्या मार्गात बदल, ट्राफिक ते लोकल ट्रेन संदर्भात सर्व माहिती एका क्लिकवर

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा