उद्योदपती अनिल अंबानींनी रिलायन्स कम्युनिकेशनच्या संचालक पदाचा दिला राजीनामा

दिवाळखोरीच्या प्रक्रियेतंर्गत लवकरच रिलायन्स कम्युनिकेशनच्या संपत्तीचा लिलाव होणार असल्याची माहिती सूञांनी दिली आहे.

SHARE

देशाच्या उद्योगक्षेञात अग्रेसर असलेल्या रिलायन्स कम्युनिकेशन ही कंपनी सध्या दिवाळ खोरीत अडकली आहे. त्यामुळेच प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांनी शनिवारी रिलायन्स कम्युनिकेशनच्या संचालकपदाचा राजीनामा दिला. 


दिवाळखोरीच्या प्रक्रियेतंर्गत लवकरच रिलायन्स कम्युनिकेशनच्या संपत्तीचा लिलाव होणार असल्याची माहिती सूञांनी दिली आहे. अंबानी यांच्यासह छाया विरानी, रायना कारानी, मंजरी काकेर आणि सुरेश रंगाचर यांनी सुद्धा कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. शुक्रवारी रिलायन्स कम्युनिकेशन्सने दुसऱ्या तिमाहीचे आकडे जाहीर केले आहेत. जुलै ते सप्टेंबर तिमाहीत कंपनीला ३०,१४२ कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे.

दिवाळखोरीच्या प्रक्रियेत असलेल्या आरकॉमने मागच्यावर्षी याच तिमाहीत १,१४१ कोटीचा फायदा कमावला होता. सध्या शेअर बाजारात आरकॉमच्या शेअरचा भाव ५९ पैसे आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या