Advertisement

हिमालय पुलाची लवकरच पुनर्बाधणी; ६ कोटी ३८ लाखांचा खर्च अपेक्षित

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) परिसरातील हिमालय पुलाची पुनर्बाधणी लवकरच करण्यात येणार आहे. या पुलासाठी स्टीलची तुळई (गर्डर) टाकण्यात येणार आहे.

हिमालय पुलाची लवकरच पुनर्बाधणी; ६ कोटी ३८ लाखांचा खर्च अपेक्षित
SHARES

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) परिसरातील हिमालय पुलाची पुनर्बाधणी लवकरच करण्यात येणार आहे. या पुलासाठी स्टीलची तुळई (गर्डर) टाकण्यात येणार आहे. या पुलासाठी ६ कोटी ३८ लाखाचा खर्च अंदाजित आहे. मागील वर्षी १४ मार्च २०१९ रोजी सायंकाळी गर्दीच्या वेळी हिमालय पुलाचा भाग भर रस्त्यात कोसळला. या दुर्घटनेत सहा जणांचे बळी गेले तर ३० जण जखमी झाले. 

गतवर्षी हा पूल पडला असून, अद्याप या पुलाची दुरूस्ती झाली नव्हती. मात्र, अखेर या पुलाच्या पुनर्बांधणीसाठी पूल विभागानं निविदा मागवल्या आहेत. पूर्वीचा पूल गंजल्याचं सर्वेक्षणात आढळलं होतं. त्यामुळं या पुलासाठी स्टीलची तुळई (गर्डर) टाकण्यात येणार आहे. या पुलासाठी ६ कोटी ३८ लाखाचा खर्च अंदाजित आहे.

या पुलाच्या दुर्घटनेमुळं पालिकेवर प्रचंड टीका झाली तसेच रेल्वे प्राधिकरणावरही आरोप झाले. या दुर्घटनेनंतर पूल विभागातील ३ अभियंत्यांना अटक करण्यात आली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून मुंबईतील सर्वच पुलांचे नंतर सर्वेक्षणही करण्यात आले.

या पुलासाठी स्टीलचा गर्डर बसवण्यात येणार आहे. पुलाचं काम पावसाळा धरून सव्वा वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहे. काम करत असताना वाहनांच्या वर्दळीचं नियोजन वाहतूक पोलिसांच्या मार्गदर्शनानं करण्यात येणार असून, पादचाऱ्यांसाठी मात्र हा रस्ता बंद करता येणार नाही, असं निविदेच्या अटी शर्तीमध्ये म्हटलं आहे.

दक्षिण मुंबईत खाऱ्या हवेमुळे धातू गंजण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे या पुलाच्या अधिक मजबुतीसाठी स्टीलचे गर्डर वापरण्यात येणार आहेत. या पुलाला नेहमीप्रमाणे पायऱ्या असतील. हिमालय पुलाचे वेल्डिंग निघाल्यामुळं ६ बाय ८ फुटांचा भाग पडला होता.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा