Advertisement

मुंबईत समुद्राखालून बुलेट ट्रेन धावणार, देशातील सर्वात मोठी मशीन वापरणार

बीकेसी ते कल्याण शीळफाटा दरम्यान 21 किलोमीटर बोगदा तयार होत आहे.

मुंबईत समुद्राखालून बुलेट ट्रेन धावणार, देशातील सर्वात मोठी मशीन वापरणार
SHARES

मुंबईत आता समुद्राखालून बुलेट ट्रेन धावणार आहे. त्यासाठी समुद्राखालून सात किलोमीटरचा बोगदा तयार करण्यात येत आहे. त्यासाठी देशातील सर्वात मोठी टीबीएम मशीन वापरण्यात येणार आहे.

बीकेसी ते कल्याण शीळफाटा दरम्यान 21 किलोमीटर बोगदा तयार होत आहे. त्यातील 7 किलोमीटरचा बोगदा ठाणेखाडी खालील समुद्रात असेल. या 21 किलोमीटरच्या बोगद्यासाठी एकूण तीन टीबीएम मशीन (टनेल बोरिंग मशीन) लावण्यात येतील. त्यापैकी एक मशीन देशातील सर्वात मोठी असेल.

यात 16 किलोमीटर बोगद्याचं काम तीन मशीनद्वारे केली जाईल. ही सर्वात मोठी टीबीएम मशीन 13.1 मीटर व्यासाची असणार आहे. यापूर्वी कोस्टल रोडसाठी 12 व्यासाची टीबीएम मशीन वापरण्यात आली होती. अफकॉन्स कंपीनीने हे काम हाती घेतलं आहे.

अफकॉन्स कंपनी या आर्थिक वर्षात विविध भूमिगत मेट्रो प्रकल्पांसाठी तब्बल 20 टनेल बोरिंग मशीन (TBM) तैनात करणार आहे. या वर्षी एकूण 17 टीबीएम तैनात केले जाणार आहे. आणखी तीन पुढील वर्षीच्या सुरुवातीला तैनात केले जाणार आहेत.

नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) ने अलीकडेच अफकॉन्स सोबत भारतातील पहिला समुद्राखालील रेल्वे बोगदा (first undersea rail tunnel) बांधण्यासाठी करार केला आहे, तो मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन (Mumbai-Ahmedabad Bullet Train) प्रकल्पासाठी 21 किमी लांबीचा बोगदा आहे.

ठाणे खाडीच्या तिथे समुद्राखालील बोगदा 7 किमी लांब आणि जमिनीच्या पातळीपासून सुमारे 25 ते 65 मीटर खाली असेल. 16 किलोमीटरचा बोगदा टीबीएम वापरून पूर्ण केला जाईल आणि पाच किलोमीटर न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथडॉलॉजी (NATM) वापरून बांधला जाईल.



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा