Advertisement

गिलबर्ट हिलच्या जतन आणि संरक्षणाची गरज - उद्धव ठाकरे

अंधेरी इथं असलेल्या या जागेवर बेकायदा अतिक्रमण यासारख्या समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचं सांगितलं जात आहे.

गिलबर्ट हिलच्या जतन आणि संरक्षणाची गरज - उद्धव ठाकरे
SHARES

जागतिक पर्यटन दिनाचं औचित्य साधून रविवारी थेट ऑनलाईन मेळाव्यात बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील गिलबर्ट हिल हेरिटेज साइटचे संरक्षण आणि जतन करण्याची गरज असल्याचं स्पष्ट केलं. 

अंधेरी इथं असलेल्या या जागेवर बेकायदा अतिक्रमण यासारख्या समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचं सांगितलं जात आहे.

मुंबईतील गिलबर्ट हिलवर बाराव्या शतकातील मंदिर असून या टेकडिचे वैशिष्ट्ये म्हणजे ती ज्या खडकापासून बनली आहे, तशा खडकातल्या जगात केवळ दोनच टेकड्या आहेत. एक मुंबईतील अंधेरीच्या बाजूची आणि दुसरी अमेरिकेतील. दोघांचा दगड एक आहे. पण अमेरिकेनं या वास्तूची जपणूक वर्ल्ड हेरिटेज म्हणून केली आहे. अपलीही अशा ठेव्याची जपणुकिसाठी प्रयत्न सुरू आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

गिलबर्ट हिल ही संरक्षित ग्रेड २चं हेरिटेज स्ट्रक्चर आहे, परंतु हे स्पष्ट आहे की वर्षानुवर्षे अधिकाऱ्यांनी या देखरेखीकडे दुर्लक्ष केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी या ऐतिहासिक जागेच्या संरक्षणाचं आश्वासन दिल्यानं, या देखभाल दुरुस्तीकडे अधिक लक्ष दिलं जाईल, अशी आशा आहे. ठाकरे यांनी म्हटल्याप्रमाणे, योग्य संसाधनं पाहता हे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू होईल.

मुख्यमंत्र्यांनी खारघर आणि नाशिक इथं एमटीडीसीच्या दोन हॉटेलचे उद्घाटन केलं. तसंच नाशिकच्या गंगापूर धरणाजवळ बोट क्लबही उघडला. ठाकरे म्हणाले की, विद्यमान पर्यटन स्थळांवरील सुविधा सुधारण्यावर नव्यानं भर देऊन महाराष्ट्राला देशातील पहिले क्रमांकाचे पर्यटन स्थळ बनवण्याचं सरकारचं लक्ष्य आहे.Read this story in English
संबंधित विषय