Advertisement

महालक्ष्मी रेसकोर्स सायकल ट्रॅक सुरू होण्यास लागतील ६ महिने

हा ट्रॅक हा इको फ्रेंडली असून बांधकामादरम्यान एकही झाड तोडण्यात आलेले नाही.

महालक्ष्मी रेसकोर्स  सायकल ट्रॅक  सुरू होण्यास लागतील ६ महिने
(Representational Image)
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) माहितीनुसार, महालक्ष्मी रेसकोर्स इथला 4-किलोमीटर लांबीचा सायकलिंग ट्रॅक या वर्षाच्या अखेरीस 2022 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

शहरातील सायकलस्वारांसाठी प्रशासकीय संस्थेचा हा आणखी एक उपक्रम आहे.

अधिका-यांनी सांगितले की, आम्ही तयार करत असलेला ट्रॅक हा इको फ्रेंडली असून बांधकामादरम्यान एकही झाड तोडण्यात आलेले नाही.

शिवाय, या ट्रॅकमुळे मुंबईकर आणि पर्यटकांना देखील फायदा होईल. कारण ते दिवसभर बाहेरून मैदानाच्या दृश्याचा आनंद घेऊ शकतील, तर लोक केवळ विशिष्ट वेळेतच मैदानात प्रवेश करू शकतील.

सायकल ट्रॅकमुळे या परिसराच्या सौंदर्यात चार चाँद लागणार तर आहेतच. पण यासोबतच या भागातील बेकायदा पार्किंगची समस्याही संपुष्टात येणार असल्याचेही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी नमूद केले.

या भूखंडाचा संपूर्ण परिसर कंपाऊंड वॉलने वेढलेला आहे, तथापि, गेल्या काही वर्षांत भिंती आणि लगतच्या फूटपाथवर अतिक्रमण झाले आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

अधिका-यांनी सांगितले की एकूण प्रकल्पासाठी सुमारे ₹ 7 कोटी खर्च येईल आणि प्रकल्प पूर्ण होण्यासाठी सुमारे सहा महिने लागतील.

225 एकर परिसरात पसरलेले महालक्ष्मी रेसकोर्स हे दक्षिण आणि दक्षिण मध्य मुंबईतील अनेक रहिवाशांसाठी सकाळ आणि संध्याकाळ फिरण्यासाठी लोकप्रिय ठिकाण आहे.

दरम्यान, हे लक्षात घेण्यासारखे आहे की मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासह (एमएमआरडीए) पालिका संपूर्ण शहरात सायकल ट्रॅक बांधत आहे.

सायकल ट्रॅक तयार करण्याच्या कल्पनेला राज्यमंत्री, आदित्य ठाकरे यांचे पाठबळ आहे.  मुंबईत सायकल ट्रॅक तयार करण्याची कल्पना अनेक नगरसेवक आणि स्थानिक पालिका वॉर्ड कार्यालयांनी शहर आणि उपनगरीय पट्ट्यांमध्ये हाती घेतली आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा