तृतीय पंथीयांसाठी आता स्वंतत्र स्वच्छतागृह

 Pali Hill
तृतीय पंथीयांसाठी आता स्वंतत्र स्वच्छतागृह

मुंबई - मुंबई महानगरपालिकेनं तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं तृतीयपंथीयांना महिला किंवा पुरुषांच्या सार्वजनिक स्वच्छतागृहात सहन करावी लागणारी कुचंबना आता संपणार आहे. सध्या सार्वजनिक स्वच्छतागृहात आता तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. तर भविष्यात स्वतंत्र स्वच्छतागृह देखील बांधण्यात येणार आहेत. राइट टू पीच्या प्रतिनिधींकडून गेल्या कित्येक वर्षांपासून यासंबंधीची मागणी होत होती. शुक्रवारी अखेर पालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी यासंबंधीचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे तृतीयपंथीयांना आता दिलासा मिळणार आहे

Loading Comments