Advertisement

गोरेगावमध्ये फिल्म स्टुडिओला भीषण आग


गोरेगावमध्ये फिल्म स्टुडिओला भीषण आग
(Representational Image)
SHARES

मुंबईच्या गोरेगाव परिसरातील एका स्टुडिओला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर आजूबाजुच्या परिसरात एकच खळबळ माजली आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, ही आग कशामुळे लागली? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.

गोरेगाव परिसरातील हायपर मॉलच्या मागे एका चित्रपटाच्या शुटिंगसाठी सेट उभारण्यात आला होता. दुपारी काम सुरू असताना अचानक स्टुडिओला आग लागली. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. परंतु, आगीमध्ये संपूर्ण स्टुडिओ भक्षस्थानी सापडला आहे. दूरपर्यंत आगीचे लोळ दिसून येत आहे.  सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ८ गाड्या दाखल झाल्या आहे. आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

तर दुसरीकडे मुंबईच्या अंधेरी भागातील लक्ष्मी प्लाझा या सात मजली इमारतीमध्ये सकाळी ११ वाजेच्या सुमारास आग लागली होती. इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यातील एका फ्लॅटला आग लागली होती. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ५ गाड्या दाखल झाल्या होत्या. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा