शौचालयाचे सांडपाणी रस्त्यावर

 Goregaon
शौचालयाचे सांडपाणी रस्त्यावर

चेंबूर - माहापालिकेच्या सार्वजनिक शौचालयाची गेल्या अनेक वर्षांपासून डागडुजी न झाल्याने चेंबूरच्या यशवंतनगरमध्ये सर्व सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. येथील शौचालयांच्या सर्वच टाक्या फुटल्या आहेत. परिणामी परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. याबाबत अनेकदा तक्रार करूनही पालिका याकडे कानाडोळा करत असल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे.

Loading Comments