Advertisement

शौचालयात वॉशिंग मशीन


SHARES

घाटकोपर - सार्वजनिक शौचालय. ऐकूनच नकोसं वाटलं असेल ना. पण अत्यंत स्वच्छ शौचालय आणि शौचालयात चक्क वॉशिंग मशीन. तुम्ही म्हणाल, काहीतरीच काय. पण हे खरं आहे. हे शौचालय आहे घाटकोपर पश्चिमेतल्या आझादनगरमध्ये. सुधारसेवा सोसायटीजवळ हे ‘सुविधा’ शौचालय बांधण्यात आलंय.
हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड, प्रथा सामाजिक संस्था आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेनं आमदार राम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हे शौचालय बांधलंय. नुकतंच मुंबई भाजपाध्यक्ष आशीष शेलारा यांनी त्याचं उद्घाटन केलं.
लॉन्ड्री सुविधा देणारं भारतातलं हे पहिलंच स्वच्छतागृह. या ठिकाणी महिला कपडेही धुवू शकतात. पिण्याच्या पाण्याचीही इथं सोय आहे. इतकंच नव्हे, तर लहान मुलांसाठी गच्चीवर एक छोटंसं गार्डनही बांधलंय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा