Advertisement

घरांच्या किंमती पुन्हा वाढण्याची शक्यता

घरे बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यात वाढ झाल्यामुळे घरांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

घरांच्या किंमती पुन्हा वाढण्याची शक्यता
SHARES

हक्काचं घर घेण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्यांसाठी निराशादायी बातमी आहे. मुंबईसह इतर शहरांमध्ये घरे बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यात वाढ झाल्यामुळे घरांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशांतर्गत कंपन्यांनी वाढवलेल्या सिमेंटच्या किंमती आणि आंतरराष्ट्रीय बाजारात लोखंडच्या किंमतीत वाढ झाल्यामुऴे किंमती वाढण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात आहे. 


घरांच्या किंमतीत वाढ का होणार ?

घरे बांधण्यासाठी प्रामुख्यानं सिमेंट आणि लोखंड या दोन प्रमुख गोष्टी आहे. बाजारात सिमेंट एक टनमागे 500 रुपयांनी तर लोखंड ७५० रुपयांनी महागले आहेत. मार्च महिना जवळ आल्यानं नफा वाढवण्याच्या उद्देशानं दक्षिण भारतातील सिमेंट उद्योजकांनी किंमतीत वाढ केली. त्याचा परिणाम देशातील बाजारपेठेवर पडला आहे. सिमेंटच्या कंपन्यांमध्ये असलेली चढा ओढ लक्षात घेता, सिमेंटची विक्री हव्या त्या दरानं होत नाही. त्यामुळे तोटा भरून काढण्यासाठी मार्च जवळ येताच कंपन्या साहित्यात वाढ करून तोटा भरून काढतात.  ऑक्टोंबरपासून सिमेंट आणि लोखंडाचे दर स्थिर होते. मात्र सध्या सिमेंट कंपन्यांनी ५० किलोमागे २० ते २५ रुपयांनी वाढ केली आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणात लोखंड हे ब्राझिलमधून निर्यात केले जाते.


देशातील विकासकामांवरही होणार परिणाम

देशात सुरू असलेल्या विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात लोखंडाचा वापर सुरू आहे. त्यामुळे लोखंडाला भारतात मोठी मागणी आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती वाढल्यानं देशातील लोखंड उत्पादकांनीही किंमतीत वाढ केल्याचं तज्ञांचं मत आहे. सिमेंट आणि लोखंड वाढीचा फटका हा विकासकांना बसत असल्यामुळे घराच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.   



Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा