Advertisement

एल अँड टीला मिळालं बुलेट ट्रेनचं २५०० कोटींचं कंत्राट

देशातील पहिल्या हाय स्पीड रेल कॉरिडोर प्रकल्पातंर्गत मुंबई-अहमदाबादला जोडणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्प उभारणीचं २५०० कोटी रुपयांचं कंत्राट लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो या पायाभूत सुविधा उभारणी कंपनीला मिळालं आहे.

एल अँड टीला मिळालं बुलेट ट्रेनचं २५०० कोटींचं कंत्राट
SHARES

देशातील पहिल्या हाय स्पीड रेल कॉरिडोर प्रकल्पातंर्गत मुंबई-अहमदाबादला जोडणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्प उभारणीचं २५०० कोटी रुपयांचं कंत्राट लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो या पायाभूत सुविधा उभारणी कंपनीला मिळालं आहे. कंपनीच्या वतीने शुक्रवारी ही माहिती देण्यात आली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील हा बुलेट ट्रेन मुंबई आणि अहमदाबाद या दोन शहरांदरम्यान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे तत्कालिन पंतप्रधान शिंझो अबे यांच्या उपस्थितीत सप्टेंबर २०१७ मध्ये मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या पायाभरणीचा कार्यक्रम झाला होता. तब्बल ५०८ किलोमीटरचा लांबीचा हा देशातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प असणार आहे. प्रतितास ३०० किमीहून जास्त वेगाने हे अंतर कापण्याचा मानस करण्यात आलेला आहे. 

नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) हाय स्पीड रेल कॉरिडोर प्रकल्पाची अमलबजावणी करणार आहे. हाय स्पीड रेल कॉरिडोर प्रकल्प जपानच्या इ ५ शिंकानसेन टेक्नोलॉजीवर आधारीत आहे. 

मुंबई-अहमदाबाद (mumbai to ahmadabad) बुलेट ट्रन व्यतिरिक्त दिल्ली-अहमदाबाद, दिल्ली-अमृतसर, वाराणसी-हावडा, दिल्ली-वाराणासी, मुंबई-हैदराबाद, मुंबई-नागपूर, चेन्नई-मैसोर दरम्यान हायस्पीड रेल कॉरिडोरची व्यवहार्यता तपासण्याला मंजुरी देण्यात आली आहे.

हेही वाचा- मेट्रो ३ कारशेडसाठी बीकेसीतील बुलेट ट्रेनच्या जागेची चाचपणी

परंतु महाराष्ट्र आणि गुजरातमधील शेतकऱ्यांनी केलेल्या विरोधामुळे तसंच महाराष्ट्रात सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने प्रकल्प उभारणीवर नापसंती दाखवल्याने या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे.

केंद्र सरकारने मेट्रो ३ प्रकल्पाच्या कारशेडसाठी कांजूरमार्गच्या जागेत खोडा घातल्याने राज्य सरकारकडून मध्यंतरी बीकेसीतील प्रस्तावित बुलेट ट्रेन टर्मिनसच्या जागेची पाहणी करण्यात आली होती. 

बुलेट  ट्रेन प्रकल्पासाठी महाराष्ट्रातील (Maharashtra) ४३१ हेक्टर जमिनीची आवश्यकता असून ८१ हेक्टर जमिनीचे भूसंपादन झालं आहे. गुजरातमधील ७०५ हेक्टर जमिनीपैकी ६१७ हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झालं आहे. तर दादरा नगर आणि हवेली या केंद्रशासित प्रदेशातील ६.९ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी १.८ लाख कोटी रुपये खर्च येणार आहे. यापैकी ८१ टक्के रक्कम जपान कडून कर्जाऊ घेण्यात येणार आहे. 

'असा' आहे बुलेट ट्रेन प्रकल्प?

  • बुलेट ट्रेन प्रकल्पाचा खर्च ११ लाख कोटी रुपये
  • ८१ टक्के निधी जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी (जायका)कडून मिळणार 
  • निधी ०.१ टक्के व्याजावर ५० वर्षे मुदतीच्या कर्जाच्या माध्यमातून मिळणार
  • प्रकल्पासाठी नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनची स्थापना 
  • कॉर्पोरेशनमध्ये महाराष्ट्र आणि गुजरात राज्याची प्रत्येकी ५ हजार कोटी, तर केंद्र सरकारची १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक 
  • मुदत २०२३ पर्यंत

(l & t gets mumbai ahmedabad bullet train 2500 crore rupees contract)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा