Advertisement

कंत्रादाराला अभय का?


कंत्रादाराला अभय का?
SHARES

लालबाग  - लालबाग पुलाच्या निष्कृष्ट दर्जाच्या कामाचा वारंवार प्रत्यय येऊनही पालिका आणि एमएमआरडीए सिम्प्लेक्स कंपनीवर मेहरबान असल्याचे चित्र पाहायला मिळतंय.. याधी 2010 मध्ये पुलाचा भाग कोसळून तीन कारचे नुकसान झाले होते. तर एक जण जखमी झाला होता. त्यानंतर 2011 मध्ये पुलाचे उद्घाटन झाल्यानंतर काही तासातच भला मोठा खड्डा पडला होता. आणि आता तर पुलाचा गर्डर सरकलाय तरी पालिका आणि एमएमआरडीए कंत्राटदारावर मेहरबान असल्याचे चित्र पाहायला मिळतंय. 2010 मध्ये पुलाचा भाग कोसळला तेव्हा चौकशी करत फक्त 5 लाखांचा दंड आकारण्यात आला होता. विशेष म्हणजे आताही पालिकेच्या अभियंत्याने आधी पुलाची दुरुस्ती महत्त्वाचे असल्याचे म्हणत कंत्राटदाराविरोधात कारवाई करणार का या प्रश्नाला बगल दिलीय. तर दुसरीकडे एमएमआरडीएनं यातून अंगच काढत सर्वस्वी जबाबदारी पालिकेची असल्याची प्रतिक्रीया एमएमआरडीएचे सहप्रकल्प संचालक दिलीप कवठकर यांनी दिली. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सर्वच्या सर्व उड्डाणपुलाचे सुरक्षा ऑडिट करण्याची मागणी केलीय. तसेच दोषींना काळ्या यादीत टाकत काळ्या यादीत टाका अशीही मागणी त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्याना केलीय. सिम्पलेक्सने दुरुस्तीचे काम हाती घेतले असले तरी दुरुस्तीला दोन दिवसांचा अवधी लागणार असल्याचे पालिका अभियंत्यांनी सांगितलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा