Advertisement

पंतप्रधान आवास योजनेची सोडत जाहीर

राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना दर्जेदार आणि माफक दरात हक्कांची घरे मिळवून देण्याचं काम सुरु आहे.

पंतप्रधान आवास योजनेची सोडत जाहीर
SHARES

राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना दर्जेदार आणि माफक दरात हक्कांची घरे मिळवून देण्याचं काम सुरु आहे. सोडतीमध्ये ज्यांचं घरांचं स्वप्न पूर्ण झालं नाही, त्यांनी निराश होऊ नये, पुढच्या लॉटरी प्रक्रियेमध्ये परत अर्ज करावेत, आपलंही घराचं स्वप्न पूर्ण होईल, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. 

येथील अल्पबचत सभागृहात पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणामार्फत पेठ क्रमांक १२, आकुर्डी इथं प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत विकसित करण्यात आलेल्या अत्यल्प उत्पन्न घटकांसाठी ३ हजार ३१७ व अल्प उत्पन्न घटकांसाठी १ हजार ५६६ असे एकूण ४ हजार ८८३ सदनिकांसाठीची ऑनलाईन सोडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते काढण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी जिल्हाधिकारी तथा पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बन्सी गवळी यांच्यासह संबधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा- कर्करोग रुग्णांच्या नातेवाईकांसाठी म्हाडाकडून टाटा रूग्णालयाला १०० सदनिका

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, स्वत:चं घर असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. या सोडतीमध्ये ज्यांचं घरांचं स्वप्न पूर्ण झालं नाही, त्यांनी निराश होऊ नये, पुढच्या लॉटरी प्रक्रियेमध्ये परत अर्ज करावेत, आपलंही घराचं स्वप्न पूर्ण होईल, असं सांगून सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरे मिळवून देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून काम सुरु आहे. घरे उपलब्ध करुन देण्याची प्रक्रिया संगणकीय असून अत्यंत पारदर्शक आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या वशिलेबाजीला थारा नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.

२०२२ पर्यंत सर्वांना हक्काचं घर उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचं सांगून नागरिकांनी या प्रकियेमध्ये सहभागी होऊन योग्य त्या सूचना कराव्यात. या सूचना लक्षात घेऊन तशा सुधारणा करण्यात येतील, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

(maharashtra deputy cm ajit pawar inaugurate pm awas yojana mhada lottery in pune)


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा