Advertisement

मुंबईवर मेट्रो‘घात’?


SHARES

मुंबई - आरेमध्ये मेट्रो-3 चे कारशेड झाल्यास मिठी नदीचे पाणी पावसाळ्यात चकाला आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात घुसेल आणि मुंबईत पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. कारशेडची जागा निश्चित करण्यासाठी सरकारने निवडलेल्या विशेष समितीतील दोन सदस्यांनीच हा दावा केलाय. आरटीआय कार्यकर्ते झोरू बाथोना यांनी ही माहिती समोर आणलीय.

आरेतील 2000 झाडांसह मुंबईतील 5011 झाडांची कत्तल या प्रकल्पात होणार आहे. याचा परिणाम पर्यावरणावर होणार आहे. त्यामुळे या सदस्यांनी कारशेडसाठी इतर पर्यायही सुचवले होते. मात्र त्याकडे काणाडोळा केल्याचा आरोप बाथोना यांनी केला.

समितीतील इतर सदस्य हे सरकारी बाबू असून, ते सरकारच्याच बाजूने बोलणार. जर सरकारला आरेतच कारशेड बांधायचं होतं तर मग समिती कशाला? आणि समितीत पर्यावरण तज्ज्ञांची नियुक्ती कशाला? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित करत आता बाथोना यांनी याविरोधात थेट न्यायालयात धाव घेतलीये. त्यामुळे आता आरे कारशेडचा विषय पुन्हा पेटणार यात शंका नाही.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा