Advertisement

Mhada Lottery 2023 : आता 21 नाही तर फक्त 7 कागदपत्र जमा करा

मुंबईतील घरांसाठी आजपासून रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे.

Mhada Lottery 2023 : आता 21 नाही तर फक्त 7 कागदपत्र जमा करा
SHARES

मुंबईतील घरांसाठी आजपासून रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे. पण अर्ज करण्याच्या पद्धत आणखी सोपी करण्यात आली आहे. या अंतर्गत आता अर्जदारांना आता 21 कागदपत्रं सादर करावी लागणार नाहीत.

म्हाडाच्या लॉटरीमध्ये 21 कागदपत्र जमा करावी लागायची. याशिवाय प्रक्रियाही किचकट होती. त्यामुळे अर्ज करण्यात अनेक समस्या यायच्या. आता कागदपत्रांची संख्या कमी करण्यात आली आहे. लॉटरीत सहभागी होण्यासाठी अर्जदारांना आता 7 कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.

म्हाडा लॉटरीत सहभागी होण्यासाठी आतापर्यंत 21 कागदपत्रं सादर करावी लागत होती. म्हाडा लवकरच मुंबईत 4 हजार घरांसाठी लॉटरी काढणार आहे. आता अर्जदारांना म्हाडाच्या घरांसाठी फक्त 7 कागदपत्र जमा करून सहभागी होता येणार आहे.

यामध्ये आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, पॅनकार्ड, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, प्रतिज्ञापत्र, जात प्रमाणपत्र आणि त्या प्रवर्गाचा दाखला यांचा समावेश आहे. कागदपत्र जास्त असल्याने ती पडताळण्यासाठी वेळही लागायचा. त्यामुळे इतर प्रक्रियाही उशिराने होत असते. आता कागदपत्र कमी केल्याने लॉटरीची प्रक्रिया देखील जलद गतीने होईल.

कागदोपत्री काम कमी करून प्राधिकरणाने आपले कामही कमी केले आहे. २०२३ सालची म्हाडाची लॉटरी ही यापूर्वी जारी करण्यात आलेल्या सर्व लॉटरींपेक्षा वेगळी असणार आहे. आता तुम्हाला सारखं रजिस्ट्रेशन करावं लागणार नाही. एकदा रजिस्ट्रेशन केलं की त्या आयडीवरून तुम्ही पुन्हा फॉर्म भरू शकता.

जर तुम्हाला आधी घर लागलं असेल आणि तुम्ही दुसऱ्यांदा अर्ज केला तर तुमचं नाव ड्रॉप केलं जाणार आहे. मात्र तुमचं आधीच्या लॉटरीत नाव लागलं नाही तर तुम्ही पुन्हा अर्ज करण्यासाठी पात्र असाल.

कागदोपत्री काम कमी करून प्राधिकरणाने आपले कामही कमी केले आहे. २०२३ सालची म्हाडाची लॉटरी ही यापूर्वी जारी करण्यात आलेल्या सर्व लॉटरींपेक्षा वेगळी असणार आहे. आता तुम्हाला सारखं रजिस्ट्रेशन करावं लागणार नाही. एकदा रजिस्ट्रेशन केलं की त्या आयडीवरून तुम्ही पुन्हा फॉर्म भरू शकता.

तुम्ही म्हाडाच्या https://www.mhada.gov.in/en   या वेबसाईट जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.हेही वाचा

आता अॅपद्वारे होणार म्हाडाच्या लॉटरीची नोंदणी, अर्जदारांना 'हे' दोन पर्याय

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा