Advertisement

म्हाडाकडून गरीबांची चेष्टा! अत्यल्प गटातील घरं ३० लाख ७१ हजारांत!


म्हाडाकडून गरीबांची चेष्टा! अत्यल्प गटातील घरं ३० लाख ७१ हजारांत!
SHARES

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांची लाॅटरी नेमकी कधी फुटणार हा प्रश्न आहेच. पण आता त्याहीपेक्षा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे तो म्हणजे म्हाडा गरीबांची चेष्टा करत आहे का? हा प्रश्न उपस्थित होण्याच कारण म्हणजे मुंबई मंडळाच्या लाॅटरीतील अत्यल्प-अल्प गटातील घरांच्या किंमती. लवकरच जाहीर होणाऱ्या मुंबईतील घरांच्या लाॅटरीतील अत्यल्प गटातील घरांच्या किंमती एेकाल तर नक्कीच भोवळ येऊन पडला.

मुंबई मंडळाने वडाळा अॅण्टाॅप हिल इथल्या अत्यल्प गटातील घराची किंमत ३० लाख ७१ हजार रुपये इतकी ठरवली आहे. महिना १० ते २५ हजार रुपये कमावणारे ३० लाख ७१ हजाराचं घर कसं घेणार. घेतलं तर महिना २५ ते २८ हजारांचा गृहकर्जाचा हप्ता कसा भरणार हा प्रश्न आहे.


अत्यल्पसाठी अधिक घरं

मुंबईतील ११९४ घरांसाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध होईल, अशी घोषणा शुक्रवारी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी केली. त्यानुसार या लाॅटरीत अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च अशा सर्वच गटातील घरांचा समावेश असणार आहे. अॅण्टाॅप हिल, वडाळा, प्रतिक्षानगर, मानखुर्द, गव्हाणपाडा, घाटकोपर, गोरेगाव आणि परळ इथल्या घरांचा समावेश आहे. यंदाच्या लाॅटरीचं वैशिष्ट्य म्हणजे या लाॅटरीत सर्वाधिक घर ही अत्यल्प गटासाठी असणार आहेत. अत्यल्प गटासाठी ४८० तर अल्प गटासाठी २९३ घर असणार आहेत.  


परवडणार की नाही?

या लाॅटरीत गरीबांसाठी म्हणजेच अत्यल्प आणि अल्प गटासाठी सर्वाधिक घरं असणार आहेत ही दिलासादायक बाब मानली जाईल. पण त्याचवेळी या घरांच्या किंमती पाहता ही घरं या गटाला परवडणार की नाही हा मोठा प्रश्न आहे. तर या भरमसाठ किंमती लक्षात घेता म्हाडाच्या किंमतीच्या धोरणावरही प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. मुंबई मंडळाकडून लाॅटरीतील घरांच्या अंदाजीत किंमती जाहीर करण्यात आल्या असून अत्यल्प गटातील घरांच्या किंमती भोवळ आणणाऱ्या आहेत.


किंमतीचा उच्चांक

मानखुर्द, पीएमजीपी इथल्या अत्यल्प गटातील घराची अंदाजीत किंमत २७ लाख २६ हजार ७५७ रुपये इतकी असणार आहे. तर प्रतिक्षानगर, सायन इथल्या घराची किंमत २८ लाख ७० हजार ७०० रुपये इतकी असणार आहे. यापुढं जात वडाळा, अॅण्टाॅप हिलमधील अत्यल्प गटानं किंमतीचा उच्चांक गाठला आहे. या घराची अंदाजीत किंमत ३० लाख ७१ हजार रुपये अशी आहे.


वादाची शक्यता

अत्यल्प गटात महिना २५ हजारापर्यंत वा त्यापेक्षा कमी कमावणाऱ्यांना ३० लाख ७१  हजारांत घर देण्यात येणार आहे. त्यामुळं या घरांसाठी एकाही अर्जदाराला बॅँकेकडून कर्ज मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे हे घर अशा अर्जदारांना परवडणार कसं आणि हे घर ते घेणार कसं असा प्रश्न आहे. अत्यल्प गटातील घर ३० लाख ७१ हजाराचं असताना अल्प गटातील घर मात्र ३० लाख ७ हजार २७ रुपये आणि ३१ लाख ८५ हजार रुपयांमध्ये विकलं जाणार आहे. म्हणजेच अल्प गटातील अर्थात महिना २५ हजार ते ५० हजार रुपये कमावणाऱ्या आणि महिना २५ हजारापर्यंत कमावणाऱ्यांसाठी एकाच किंमती घरं दिली जाणार आहेत. त्यामुळे लाॅटरीच्या किंमतीमध्ये मुंबई मंडळानं चांगलाच गोंधळ घातला असून यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


म्हाडा अध्यक्षांची कबुली

याविषयी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांना विचारले असता, त्यांनी अत्यल्प गटातील घरांच्या किंमती जास्त असल्याचं कबूल केलं आहे. तर त्याचवेळी किंमतीचं नव धोरण अद्याप जाहीर झालं नसल्यानं यंदाच्या लाॅटरीतील घरांच्या किंमती कमी करता येणार नसल्याचं सांगत इच्छुकांना नाराज केलं आहे. दरम्यान, मुंबई मंडळाकडून सध्या जाहीर करण्यात आलेल्या घरांच्या किंमती या अंदाजीत असून जाहिरातीपर्यंत त्यात काही बदल होण्याची शक्यता आहे.  पण हे बदल झाले तरी दीड-दोन लाखांनी किंमती इकडे-तिकडे होतील. त्यामुळं या किंमती नक्कीच यंदा अत्यल्प गटाच्या तोंडाला फेस आणतील हे नक्की. 
घरांचा आकडा आणि अंदाजित किंमती (बदल होऊ शकतो)


ठिकाण       
   उत्पन्न गट       
घरं  
किंमत (रू.)
 अॅण्टाॅप हिल, वडाळा  
अत्यल्प गट
२७८  
३० लाख ७१ हजार
प्रतिक्षानगर, सायन  
अत्यल्प गट      
८३  
२८ लाख ७० हजार
प्रतिक्षानगर, सायन  (RR गाळे)
अत्यल्प गट  
 ५  
१६ लाख ४० हजार ३६४
पीएमजीपी, मानखुर्द  
अत्यल्प गट  
११४
२७ लाख २६ हजार ७५७
गव्हाणपाडा, मुलुंड  
अल्प  गट
२६९  
३० लाख ७ हजार २७
पंतनगर, घाटकोपर    
 मध्यम गट    
 २    
किंमत निश्चित होणे बाकी
टागोर नगर    
मध्यम गट  
 ७
किंमत निश्चित होणे बाकी
पंतनगर, ओबी -१  
उच्चगट      
 २  
किंमत निश्चित होणे बाकी
सहकारनगर      
 उच्च गट  

किंमत निश्चित होणे बाकी
सिद्धार्थनगर, गोरेगाव
अल्प गट  
२४  
३१  लाख ८५ हजार
महाविर नगर
मध्यमगट  
१७०  
५८ लाख ६६ हजार ३००
बदानी बोरी चाळ, परेल
   - ६८  
किंमत निश्चित होणे बाकी
३३ (७) अंतर्गत प्राप्त घरं  
  - २८
 किंमत निश्चित होणे बाकी

                     
                                       
                   


हेही वाचा - 

 ११९४ घर आणि १०८ दुकानांची लाॅटरी; पण तारीख काही ठरेना                           
                       

Read this story in English
संबंधित विषय