Advertisement

डोंबिवली- ठाणे प्रवास होणार 20 मिनिटांत

येत्या दोन महिन्यात रहदारीसाठी खुला करण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला.

डोंबिवली- ठाणे प्रवास होणार 20 मिनिटांत
SHARES

माणकोली (Bhiwndi) ते मोठा गाव (dombivali) पूल येत्या दोन महिन्यात रहदारीसाठी खुला होईल अशी शक्यता आहे. मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (MMRDA) अधिकाऱ्यांनी पुलाच्या बांधकामाची पाहणी केली. (Mothagaon-Mankoli Bridge)

कल्याण- डोंबिवलीकरांना लवकरात ठाणे, मुंबई गाठता यावे यासाठी एमएमआरडीए मार्फत उल्हास खाडीवर माणकोली ते मोठागाव दरम्यान पुलाचे बांधकाम सुरू आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नानंतर या पुलाच्या बांधकामाला वेग आला असून या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. 

एम‌.एम.आर.डी.ए.चे कार्यकारी अभियंता अर्जुन कोरगावकर, केडीएमसी शहर अभियंता अर्जुन अहिरे, यांच्यासह युवा सेना सचिव दिपेश म्हात्रे यांनी पुलाच्या बांधकामाची पाहणी केली आहे.

यावेळी या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये या करीता विविध उपायोजनांवर चर्चा करण्यात आली उड्डाणपुलाचे व ईतर उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करावी अशा सूचना संबंधित ठेकेदारास देण्यात आल्या आहेत. 

माणकोली- मोठागाव पूल येत्या दोन महिन्यात रहदारीसाठी खुला करण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर डोंबिवली ते ठाणे प्रवासाचा वेळ निम्म्याने कमी होण्यास मदत होणार आहे. 

माणकोली ते मोठागावपर्यंत पूल बांधण्यासाठी 2013मध्ये प्रस्ताव मांडण्यात आला होता. उल्हास नदीवर 1225 मीटर लांब व 27.5 मीटर रुंद पूल प्रस्तावित करण्यात आला होता. मात्र, भूसंपादन प्रक्रिया लांबल्याने प्रत्यक्षात पुलाचे काम 18 सप्टेंबर 2016 रोजी सुरू झाले. 

डोंबिवली ते ठाणे प्रवासाचे अंतर कापण्यासाठी दीड तास लागतो. प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी माणकोलीजवळ पूल उभारण्यात येणार आहे. हा पूल सुरू झाल्यानंतर हे अंतर अवघ्या 20 ते 30 मिनिटांवर येणार आहे. 



हेही वाचा

... तर 45 मिनिटांचे अंतर 7 मिनिटांत गाठणे शक्य, मुंबईकरांचा प्रवास जलद होणार

दहिसर ते भाईंदर ५० मिनिटांचा प्रवास आता 15 ते 20 मिनिटांत

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा