'मुंबई लाइव्ह'च्या दणक्यानंतर म्हाडाला आली जाग

 Pratiksha Nagar
'मुंबई लाइव्ह'च्या दणक्यानंतर म्हाडाला आली जाग

मुंबई - म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीतील प्रतिक्षानगरमधील इमारतींची केवळ  तीन वर्षांतच दुरवस्था झाली आहे. या दुरवस्थेत रहिवासी कसे राहतायेत, म्हाडाच्या बांधकामाचा दर्जा किती खराब आहे? याचा पर्दाफाश मंगळवारी 'मुंबई लाइव्ह'ने केला होता. 'मुंबई लाइव्ह'च्या दणक्यानंतर म्हाडाचे मुंबई मंडळ खडबडून जागे झाले आहे. मंगळवारी वृत्त प्रसिद्ध झाल्याच्या दिवशीच मंडळाच्या आणि कंत्राटदारांच्या अधिकाऱ्यांनी चैतन्य इमारतीची पाहणी केली आहे. तर बुधवारपासून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केल्याची माहिती येथील रहिवासी हसमुख शेलार यांनी दिली आहे.

सोडतीतील इमारतींच्या बांधकामाचा दर्जा सुमार असल्याचे सर्वज्ञात आहे. रहिवाशांकडून वारंवार दर्जाबाबत तक्रारी होऊन म्हाडा मात्र दर्जा सुधारण्यासाठी कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाही. म्हाडाच्या या उदासीन धोरणाचा फटका प्रतिक्षानगरमधील रहिवाशांना कसा बसतोय हेच मुंबई लाइव्हने आपल्या विशेष वृत्ताद्वारे मांडले होते. या वृत्तानंतर मंडळाने त्वरीत चैतन्य इमारतीच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे येथील रहिवाशांनी मुंबई लाइव्हचे विशेष आभार मानले आहेत.

कंत्राटदाराने गळती, फ्लोरींग आणि इतर दुरूस्तीचे काम करणार असल्याचे रहिवाशांना सांगितले आहे. त्यामुळे रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. पण संरक्षण भिंत बांधून देण्याची रहिवाशांची मागणीही महत्त्वाची आहे. त्यामुळे संरक्षण  भिंतीचा प्रश्नही म्हाडाने निकाली लावावा अशी अपेक्षा येथील रहिवाशांनी व्यक्त केली आहे.

Loading Comments