Advertisement

Mumbai Traffic Update: अंधेरीतील गोखले रोड पूल 'या' तारखेपासून वाहतुकीसाठी बंद

मुंबई पोलिसांनी (Mumbai Traffic Police) याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

Mumbai Traffic Update: अंधेरीतील गोखले रोड पूल 'या' तारखेपासून वाहतुकीसाठी बंद
SHARES

अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा (Andheri Connector Bridge) गोखले पूल (Gokhale Road Bridge) पुनर्बांधणीसाठी बंद करण्यात येणार आहे. हा पूल सोमवार, 7 नोव्हेंबरपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Traffic Police) याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिका (BMC) आणि मुंबई पोलिसांनी या पुलाची पाहणी केली होती. हा पूल अंधेरी पूर्व आणि पश्चिम (Andheri East and Andheri West) दरम्यानच्या प्रमुख आणि उपनगरातील सर्वात रहदारी असणाऱ्या मार्गांपैकी एक आहे.

मुंबई महापालिकेने नियुक्त केलेल्या सल्लागार कंपनीने गोखले पूल वाहनांच्या वाहतुकीसाठी असुरक्षित असल्याचे सांगत तो बंद करण्याची सूचना केली होती. पुनर्बांधणीसाठी हा पूल किमान दोन वर्ष सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पर्यायी मार्ग कोणते?

पूल बंद झाल्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीला लक्षात घेता वाहतूक पोलिसांनी वाहतुकीसाठी 6 पर्यायी मार्ग दिलेले आहेत.

  • खार सबवे, खार
  • मिलन सबवे उड्डाणपूल, सांताक्रूझ
  • कॅप्टन गोरे उड्डाणपूल (विलेपार्ले उड्डाणपूल), विलेपार्ले
  • अंधेरी सबवे, अंधेरी, मुंबई
  • बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल, जोगेश्वरी
  • मृणालताई गोरे उड्डाणपूल, गोरेगाव

जुलै 2018 मध्ये गोखले रोड पुलाचा एक भाग कोसळला होता. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला होता. त्याशिवाय पश्चिम रेल्वेवरील वाहतूक कोलमडली होती. या घटनेनंतर मुंबई महापालिकेने शहरातील पुलांच्या सुरक्षितेसाठी ऑडिट केले.

पुलाचा एक भाग कोसळल्यानंतरही गोखले रोड पूल अंशत: वाहतुकीसाठी खुला होता. पूर्ण क्षमतेने वाहतूक होत नसल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी होत होती. मात्र, आता, कालांतराने पूल वाहतुकीसाठी असुरक्षित झाल्याने त्याची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे.



हेही वाचा

मुंबईकरांनो लक्ष द्या! लवकरच, नरिमन पॉइंट ते विरार दरम्यान 1 तासात प्रवास करू शकाल

मोनो मार्गिका लवकरच मेट्रो आणि रेल्वेशी जोडली जाणार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा