Advertisement

मेट्रो ३च्या 'त्या' मार्गाचं ९६ टक्के भुयारीकरण पूर्ण

कुलाबा ते सीप्झ या 'मेट्रो ३'च्या हुतात्मा चौक ते सीएसएमटी पॅकेज १ मार्गाचं ९६ टक्के भुयारीकरण पूर्ण झालं आहे.

मेट्रो ३च्या 'त्या' मार्गाचं ९६ टक्के भुयारीकरण पूर्ण
SHARES

कुलाबा ते सीप्झ या 'मेट्रो ३'च्या हुतात्मा चौक ते सीएसएमटी पॅकेज १ मार्गाचं ९६ टक्के भुयारीकरण पूर्ण झालं आहे. एकूण ४१८ रिंगच्या साहाय्यानं १०६ दिवसात या भुयारीकरणाचा ३७ वा टप्पा पार पडला. या भुयारीकरणासह ‘पॅकेज-१’ मधील कफ परेड ते सीएसएमटी दरम्यान एकूण २.९ किमी लांबीचे डाऊन लाइनचे भुयारीकरण पूर्ण झाले आहे.

कुलाबा ते सीप्झ दरम्यान अनेक ऐतिहासिक वारसा इमारती आहेत. या मेट्रो मार्गिकेजवळ समुद्र आहे. त्यामुळं त्याचं काम करणं जिकिरीचं होतं. सूर्या २ या रॉबिन्स बनावटीच्या डय़ुएल मोड हार्ड रोक टनेल बोअरिंग मशीनद्वारे हुतात्मा चौक ते सीएसएमटी हे भुयारीकरण पूर्ण करण्यात आले. यासह ‘मेट्रो ३’चे ९५ टक्के भुयारीकरणाचे काम पूर्ण झालं आहे. ‘पॅकेज-१’ अंतर्गत कफ परेड, विधान भवन, चर्च गेट आणि हुतात्मा चौक या मेट्रो स्थानकांचा समावेश आहे.

आतापर्यंत या पॅकेजअंतर्गत ६ भुयारीकरणाचे टप्पे पूर्ण झाले आहेत. त्यातील कफ परेड ते विधान भवन अप लाइनचे १२२८ मीटर, तर डाऊन लाइनचे १२५४ मीटर, तसेच विधान भवन ते चर्चगेट अप लाइनचे ४९८ मीटर आणि डाऊन लाइनचे ४८१ मीटर भुयारीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. तसेच चर्चगेट ते हुतात्मा चौक अप लाइन ६५४ मीटर आणि हुतात्मा चौक ते सीएसएमटीदरम्यानचे डाऊन लाइन ५६९ मीटरचे भुयारीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामही पुढील काही दिवसात पूर्वत्वास नेण्यात येणार आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा