नावात काय आहे ?

मुंबई - मुंबईची लाइफलाइन समजल्या जाणाऱ्या लोकलच्या स्थानकांचे नाव बदलण्यासाठी लोकांकडून वेगवेगळ्या मागण्या केल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वी उपनगरात अंधेरी आणि जोगेश्वरीच्या मध्ये राममंदिर रेल्वे स्थानक तयार करण्यात आले. त्यानंतर एलफिस्टन स्टेशनला प्रभादेवी हे नाव देण्याचे जाहिर झाले. अवघे काही दिवस होतात न होतात तोच दादर पूर्व येथील मोनोच्या रेल्वे स्थानकाला विठ्ठल मंदिर हे नाव द्यावे अशी मागणी करण्यात आली. देवांची किंवा मंदिरांची नावे रेल्वे स्थानकांना द्यावीत का? याविषयी सर्वसामान्यांना काय वाटते? हे जाणून घेण्याचा ‘मुंबई लाइव्ह’ने प्रयत्न केला. यावेळी बहुतांश लोकांनी अशी मंदिर कींवा देवांची नावे स्टेशनला देण्याची गरजच काय? त्यापेक्षा स्टेशनवर सोयी-सुविधा आणि स्वच्छता ठेवण्यासाठी आग्रह धरा अशी मागणी केली. तर काही जणांनी देवांची नावं दिली तर बिघडले कुठे असा सवाल उपस्थित केला.

Loading Comments