Advertisement

Ready reckoner rates: रेडीरेकनरच्या दरांत ‘इतकी’ वाढ

राज्य सरकारने रेडी रेकनरच्या दरांमध्ये नाममात्र वाढ केली आहे

Ready reckoner rates:  रेडीरेकनरच्या दरांत ‘इतकी’ वाढ
SHARES

राज्य सरकारने स्थावर वा जंगम मालमत्तांच्या खरेदी-विक्रीसाठी आवश्यक ठरणारा वार्षिक बाजारमूल्य दर तक्ता अर्थात रेडीरेकनरच्या दरांत सरासरी १.७४ टक्के वाढ केली आहे. यामुळे मालमत्तांच्या किंमतीत नाममात्र वाढ बघायला मिळेल. हे नवीन दर शनिवार १२ सप्टेंबरपासून लागू होणार आहेत.

मालमत्ताच्या खरेदी-विक्रीसाठी रेडीरेकनरचे दर महत्त्वाचे ठरतात. दरवर्षी १ एप्रिल रोजी रेडीरेकनरचे दर जाहीर केले जातात. परंतु मध्येच आलेल्या कोरोना संकटामुळे सन २०१९ चे दर स्थिर ठेवण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात कपात केल्यानंतर रेडीरेकनरचे दर कधी घोषित करण्यात येणार, अशी मागणी सातत्याने विरोधकांकडून करण्यात येत होती. एवढंच नाही, तर या दरांमध्ये कपात करण्याची मागणीही होत होती. 

राज्य सरकारने हे दर जाहीर करताना त्यात नाममात्र १.७४ टक्क्यांची वाढ केली आहे. त्याचा थोडाफार परिणाम मालमत्तांच्या किंमतीवर होईल. तब्बल अडीच वर्षांनी दरांमध्ये वाढ झाली असून ही वाढ नैसर्गिक असल्याचं राज्याचे नोंदणी महानिरीक्षक ओमप्रकाश यांनी सांगितलं.

रेडीरेकनरच्या नव्या दरांनुसार ग्रामीण भागात २.८१ टक्के, प्रभाव क्षेत्रात १.८९ टक्के, नगरपालिका, नगर पंचायत क्षेत्रात १.२९ टक्के वाढ आणि महानगरपालिका क्षेत्रात १.२ टक्के वाढ करण्यात आली आहे. राज्यात सर्वाधिक ३.९१ टक्के इतकी वाढ पुणे जिल्ह्यात झाली आहे. तर पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात ३.२ टक्के वाढ झाली आहे. पीएमसी क्षेत्रात ही वाढ २ टक्के आहे. मुंबई उणे सहा (-६) टक्के, ठाण्यात ०.४४ टक्के, नाशिकमध्ये ०.७४ टक्के, नागपूरमध्ये ०.१ टक्के, नवी मुंबईत ०.९९ टक्के, रायगडमध्ये ३ टक्के अशी वाढ करण्यात आली आहे. कोरोना काळात महसुलात ६० टक्के घट झाली आहे, तर दस्त नोंदणीत ४० टक्के घट झाली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा