म्हाडाच्या घराचा भार होणार हलका

 Pali Hill
म्हाडाच्या घराचा भार होणार हलका

मुंबई - म्हाडाच्या पात्र विजेत्यांना देकार पत्र हातात पडल्याबरोबर आता घराचं स्वप्न पूर्ण होणार या विचाराने आनंद होतो. पण त्याहीपेक्षा घराची 25 टक्के रक्कम आता 30 दिवसांत कशी आणि कुठून भरणार याची चिंता आणि मग धावपळ सुरू होते. यापुढे मात्र अत्यल्प गटातील विजेत्यांची ही चिंता दूर होणार असून त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण आता 25 टक्क्यांएेवजी केवळ 10 टक्के रक्कम अत्यल्प गटातील विजेत्यांना भरावी लागणार आहे.

बँकेकडून घरासाठी 90 टक्के रक्कम मिळत असताना विजेत्यांना स्वत:हून 25 टक्के रक्कम उभारत 75 टक्के गृहकर्ज घ्यावे लागते. 25 टक्के रक्कम उभारणे अत्यल्प गटातील विजेत्यांना खूपच अवघड असते. त्यामुळे अत्यल्प गटातील विजेत्यांना दिलासा देण्यासाठी घराची केवळ 10 टक्के रक्कम सुरुवातीला भरण्याची मुभा देण्याचा प्रस्ताव प्राधिकरणाचा असल्याची माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष संभाजी झेंडे यांनी मुंबई लाइव्हला दिली आहे. यासंबंधीचा अंतिम निर्णय लवकरच होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

Loading Comments