नवरात्रीसाठी स्वस्तात वीज

 Bhandup
नवरात्रीसाठी स्वस्तात वीज

भांडुप - नवरात्रौत्सवासाठी महावितरणकडून मंडळांना स्वस्तात वीजपुरवठा करण्यात येत आहे. अवघ्या 3 रुपये 71 पैसे इतक्या सवलतीच्या दराने हा वीजपुरवठा करण्यात येत असून, मंडळांनी तात्पुरती अधिकृत वीजजोडणी घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. नवरात्रोत्सवासाठी वीजसुरक्षेबाबत गांभीर्याने उपाययोजना कराव्यात, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

"तातडीच्या मदतीची संभाव्य गरज पाहता मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी 24 तास सुरू असलेल्या कॉल सेंटरच्या 1912, 1800-200-3435 किंवा 1800-233-3435 या क्रमांकावर संपर्क साधावा", असे आवाहन भांडुप नागरी परिमंडळाचे मुख्य अभियंता सतीश करपे यांनी केले आहे.

Loading Comments