Advertisement

वांद्रेतल्या 'या' भागातील दुकानं ऑड-इव्हन पद्धतीनं राहणार खुली

अत्यावश्यक वस्तू घेण्याच्या दृष्टीनं अनेक ठिकाणी गर्दी केली जाते. या गर्दीला ओटोक्यात आणण्यासाठी ही आयडिया केली आहे.

वांद्रेतल्या 'या' भागातील दुकानं ऑड-इव्हन पद्धतीनं राहणार खुली
SHARES

भारतात लॉकडाऊन असूनही नागरिक नियमांकडे दुर्लक्ष करत आहेत. सामाजिक अंतर ठेवण्याचे आदेश असतानाही त्याकडे सर्रास दुर्लक्ष केलं जातंय. वांद्रे पश्चिमेतील बाजार रोडच्या आसपास देखील असंच चित्र पहायला मिळालं. पालिका आणि पोलिस लोकांना रस्त्यावर येण्यापासून रोखण्यास अक्षम ठरत आहेत. हे लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी)नं ऑड आणि इव्हन ( क्षम आणि विषम) या पद्धतीनं अत्यावश्यक सेवा पुरवणारी दुकानं सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एच पश्चिम प्रभागाचे (बांद्रा, खार) सहाय्यक नगरपालिका आयुक्त विनायक विसपुते म्हणाले की, “लोकं मोठ्या संख्येनं बाहेर जमा होतात. सामाजिक अंतर ठेवण्याचे आदेश आहेत. पण या आदेशाकडे लोकं दुर्लक्ष करत आहेत. काही जण तर फक्त गप्पा मारण्यासाठी एकत्र जमतात”.

विनायक विसपुते म्हणाले की, “मार्केटमधल्या फक्त २०० मीटर क्षेत्रातच हा नियम लागू करण्यात आला आहे. ऑड आणि इव्हन या पद्धतीमुळे आम्हाला पहिल्याच दिवशी चांगले परिणाम पाहयला मिळाले. लॉकडाउन संपेपर्यंत अशाच पद्धतीनं किराणा मालाची दुकानं सुरू राहतील. त्यामुळे आमच्या भागात इतकी गर्दी नव्हती.”

महानगरपालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे मुंबईत उभारण्यात आलेल्या कंटेंट झोनमध्ये फळ आणि भाजीपाला दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत, पालिकेनं शहरातील २४१ कंटेंट झोन चिन्हांकित केले आहेत. सीलबंद भागात राहणाऱ्यांसाठी फळे आणि भाजीपाल्याची व्यवस्था अधिकाऱ्यांमार्फत केली जाईल, असंही आयुक्तांनी नमूद केलं.

वांद्रे परिसरातील एका काँग्रेस नगरसेवकानं या निर्णयाचं कौतुक केलं आहे. ते म्हणाले, “याचीच आवश्यक्ता होती. लोक सामाजिक अंतराचे महत्त्व समजून घेत नाहीत. त्यांना बर्‍याचदा सांगितले गेलं आहे. पण गर्दी कमी झाली नाही, ”

वांद्रेतल्या बाजाररोड इथली दक्षिणेकडील दुकानं एक दिवस ऑड तारखेला खुली असतील तर उत्तर पट्ट्यातील दुकानं इव्हन तारखेला खुली असतील.



हेही वाचा

‘हाफकिन’च ठरवणार मास्क, पीपीई किटचा दर्जा, अन्यथा कारवाई

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा