वरळीकर SRA प्रकल्पाच्या प्रतिक्षेत

 Dadar
वरळीकर SRA प्रकल्पाच्या प्रतिक्षेत
वरळीकर SRA प्रकल्पाच्या प्रतिक्षेत
वरळीकर SRA प्रकल्पाच्या प्रतिक्षेत
See all

वरळी - SRA चे मुख्य सचिव विश्वास पाटील यांच्या दालनात रहिवाश्यांची बैठक होऊनही न्याय मिळाला नसल्यानं स्थानिक नाराज झालेत. वरळीमधील लोकांच्या SRA संदर्भात असणाऱ्या समस्या तात्काळ मार्गी लागाव्यात यासाठी आमदार सुनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली SRA प्रकल्पाचे विकासक व रहिवासी यांची 10 नोव्हेंबर रोजी संयुक्त बैठक पार पडली होती. मायानगर ,अचानकनगर, सहकारी गृह निर्माण संस्था यांचे थकित भाडे त्वरित ८ दिवसांत वाटप करावे आणि अपूर्ण बांधकाम १८ महिन्यात पूर्ण करावे, असं आकृती बिल्डर्सला शिवसेनेकडून आदेश देऊनही त्याची पूर्तता झाली नसल्याचं समोर आलंय. तसेच ट्राय पार्टी अॅग्रीमेंटबाबत कायदेशीर पडताळणी करून पूर्तता कूर असं आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी दिलं होतं. मात्र त्याचीही अमंलबजावणी अद्याप झाली नसल्यानं नागरिक नाराज झालेत. निवडणूका जवळ आल्यानं दिवस ढकलण्याचं काम राजकीय नते करत असल्याची प्रतिक्रीया स्थानिक मंगेश चौगुले यांनी मुंबई लाईव्हशी बोलताना दिली.

Loading Comments