• 30 वर्षानंतर शौचालयाच्या कामाचा मुहुर्त सापडला
  • 30 वर्षानंतर शौचालयाच्या कामाचा मुहुर्त सापडला
  • 30 वर्षानंतर शौचालयाच्या कामाचा मुहुर्त सापडला
SHARE

वडाळा - भास्कर वाडी इथल्या सार्वजनिक शौचालयाच्या कामाचा अखेर शुभारंभ झाला. 30 वर्षानं का होईना पण शौचालयाच्या कामाला सुरुवात झाली. या परिसरातल्या शौचालयाची दुरावस्था झाल्यानं रहिवाशांची नेहमी गैरसोय व्हायची. त्यामुळे रहिवाशांनी शौचालयाची मागणी केली होती. शिवसेना शाखा क्रमांक 178च्या उपविभागप्रमुख माधुरी मांजरेकर यांच्या प्रयत्नांनी शौचालयाच्या कामाला सुरुवात झाली. 30 वर्षानंतर जरी कामाला सुरुवात झाली असली तरी येत्या 10 दिवसांत काम पूर्ण होईल असा विश्वास माधुरी मांजरेकर यांनी व्यक्त केलाय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या