निमसाई लायटर्स, व्हिबज्यॉर सेव्हन विजयी

 Wadala Road
निमसाई लायटर्स, व्हिबज्यॉर सेव्हन विजयी
Wadala Road, Mumbai  -  

मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ आयोजित पहिल्या 'सुपर लीग कबड्डी स्पर्धे'ला रविवारपासून सुरूवात झाली. साखळी सामन्यातील पहिली लढत निमसाई लायटर्स आणि सातारा बँक विनर्स या संघामध्ये झाली. या सामन्यात मासूमअली सय्यदच्या अष्टपैलू खेळामुळे निमसाई लायटर्स संघाने सातारा बॅंक विनर्स संघाचा 43-26 असा पराभव करत सलामीची लढत जिंकली. सातारा बँक विनर्स संघाच्या रोहित प्रजापतीने छान खेळ केला. मासूमअली सय्यद याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

तसेच वडाळा येथील भारतीय क्रीडा मंदिर येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात श्रेयस म्हसकर यांच्या व्हिबज्यॉर सेव्हन संघाने अपना बाजार रेडर्स संघावर 52-25 असा विजय मिळविला. या साखळी सामन्यात विजयी संघातील साहिल साळवी आणि पराभूत संघातील रामदास शेंबडे या दोघांनीही अप्रतिम खेळ केल्याने दोघांनाही सामनावीराचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी 'मुंबई सुपर लीग कबड्डी'चे अध्यक्ष संजय शेटे व उपाध्यक्ष गोविंदराव मोहिते, सातारा सहकारी बँकेचे चेअरमन ज्ञानेश्वर वांगडे, राष्ट्रीय क्रीडापटू कविता नावंदे, राष्ट्रीय कबड्डीपटू किरण जिकमडे, प्रो कबड्डीपटू नितीन मोरे, राष्ट्रीय कबड्डीपटू पांडुरंग भोगले, राष्ट्रीय कबड्डीपटू रवी करमळकर उपस्थितीत होते.

Loading Comments