Advertisement

पुणेरी पलटणकडून यू मुम्बाचा पराभव


पुणेरी पलटणकडून यू मुम्बाचा पराभव
SHARES

प्रो कबड्डीच्या पाचव्या सीझनला शुक्रवारी मुंबईत प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी यू मुम्बाच्या पदरी अपयश आले. शनिवारी संध्याकाळी वरळीतील एनएससीआय स्टेडियमवर पुणेरी पलटणसोबत झालेल्या लढतीत देखील यू मुम्बाचा निसटता पराभव झाला.

अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत पुणेरी पलटणने 26-24 अशी बाजी मारत विजय मिळवला. सुरुवातीलाच पुणेरी पलटनच्या दीपक हुड्डाने संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यांनंतर मुंबई संघाच्या श्रीकांत जाधव याने 1-1 ने सामना बरोबरीत आणला. पुणे संघाच्या दिपक हुडा आणि मुंबईच्या श्रीकांत यांच्या राईडमध्ये वरचढ झाली. सुरुवातीला मुंबई संघाने उत्कृष्ट खेळ करत संघाला आघाडीवर आणले. श्रीकांत जाधव, काशीलिंग अडके, नितीन मदाने यांच्या चमकदार खेळाने यू मुम्बा संघ 17-9 अशा मोठ्या फरकाने आघाडीवर होता. त्यांच्या या कामगिरीने पुणेरी संघाला चांगलाच घाम फुटला.

पण हळूहळू पुणेरी पलटणच्या खेळाडूंच्या कामगिरीने तसेच दीपक हुडाच्या शानदार चढाई आणि बोनस पॉईंटने हा सामना 23-23 ने बरोबरीत आला. पण शेवटच्या मिनिटात यू मुम्बाला पराभव पत्कारावा लागला.

यू मुम्बा संघ आतापर्यंतच्या 8 सामन्यांमध्ये तीनदा विजयी ठरला, तर उर्वरीत पाच सामन्यांत यू मुम्बाला पराभव पत्कारावा लागला. पुणेरी पलटणने आतापर्यंतच्या सात सामन्यांत पाच सामने जिंकत दुसऱ्या स्थानावर मजल मारली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा