Advertisement

प्रभादेवीच्या सिद्धीप्रभाने कबड्डी स्पर्धेत गाठली दुसरी फेरी


प्रभादेवीच्या सिद्धीप्रभाने कबड्डी स्पर्धेत गाठली दुसरी फेरी
SHARES

मुलांच्या कबड्डी सामन्यात प्रभादेवीच्या सिद्धीप्रभाने काळाचौकीच्या साईराजचा 46-27 असा पाडाव केला. आदर्शनगर येथील वरळी स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर गुरुवारी हा सामना खेळवला गेला. साईराजने सुरुवात झोकात केली होती. त्यांनी सुरुवातीपासून एक-एक गडी टिपत आणि पकडी करत आघाडी आपल्याकडे राखली होती. 

सिद्धीप्रभाने पूर्वार्धात पाच अव्वल पकडी करत सामन्याचा निकालच बदलून टाकला. त्यांनी तीन अव्वल पकडी करत सामना 10-10 असा बरोबरीत आणला. त्यानंतर आणखी दोन अव्वल पकडी करत आघाडी घेतली. शेवटी साईराजवर लोण देत सिद्धीप्रभाने 20-11 अशी आघाडी घेतली. मध्यांतराला त्यांच्याकडे 23-14 अशी आघाडी होती. विवेक मोरे, ओमकार पवार या विजयाचे शिल्पकार ठरले. ओमकार भोसले, करण सावर्डेकर यांनी साईराजकडून चांगली सुरुवात केली होती. पण पाच अव्वल पकडीने त्यांना पराभव पत्कारावा लागला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा