Advertisement

मुंबई महापालिका अर्थसंकल्प २०२०-२१ Live Updates

SHARE

जाणून घ्या, आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका अशी ओळख असलेल्या मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पातील (२०२०-२१) प्रमुख तरतूदी

LIVE UPDATES

03:20 PM, Feb 04 IST
सर्व नागरी सेवा अर्थसंकल्पातून उपलब्ध करुन देण्याचा मानस
03:19 PM, Feb 04 IST
मुंबईकरांवर करांचं ओझं न वाढविता नावीन्यपूर्ण मार्गाने उत्पन्न वाढविणं आवश्यक -आयुक्त प्रवीण परदेशी
03:17 PM, Feb 04 IST
मुंबईत येत्या वर्षभरात ४ लाख झाडे मियावकी पद्धतीने लावणार. यासाठी २२६.७७ कोटी रुपयांची तरतूद
03:16 PM, Feb 04 IST
२०३० पर्यंत मुंबईत कचऱ्याचं प्रमाण ६७०० मेट्रिक टनवरून ५ हजार मेट्रिक टनांवर आणण्याचं लक्ष्य
03:09 PM, Feb 04 IST
पाण्याची साठवण तसंच जल बोगद्यांच्या कामासाठी १७०.७९ कोटी रुपयांची तरतूद

 

03:09 PM, Feb 04 IST
शहरातील पदपथांच्या सुधारणेसाठी ५० कोटी रुपयांची तरतूद

 

03:08 PM, Feb 04 IST
प्राॅपर्टी टॅक्स वसुली १५,००० रुपयांपर्यंत पोहोचली, पुढील वर्षांत उत्पन्न १० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता

 

03:07 PM, Feb 04 IST
अर्थसंकल्प २०२०-२१ साठी रस्ते सुधारणेसाठी १६०० कोटी रुपयांची तरतूद

 

03:06 PM, Feb 04 IST
महापालिका साॅलिड वेस्ट मॅनेजमेंट डिपार्टमेंट अंतर्गत अंबरनाथ तालुक्यात जमीन अधिग्रहण प्रक्रियेत

 

02:58 PM, Feb 04 IST
पाणी पुरवठा, गोराई जल प्रकल्पातून दररोज 440 दश लक्ष लिटर पाणी मिळणार, या प्रकल्पासाठी 503.51 कोटींची तरतूद तर या प्रकल्पात बधितांसाठी 199.40 कोटी.
02:57 PM, Feb 04 IST
मुंबई शहर 2030पर्यंत आपत्ती मुक्त करण्याचे ध्येय, जापनीज इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सी JICA या संस्थेकडून तांत्रिक सल्ला घेणार, जपान सरकारशी चर्चा सुरू आहे, ५ कोटी तरतूद, भारत सरकारच्या अर्थ खात्यानं मंजुरी दिली आहे.
02:55 PM, Feb 04 IST
अर्थसंकल्पात उद्यान विभागासाठी २२६.७७ कोटी रुपयांची तरतूद

 

Advertisement
02:55 PM, Feb 04 IST
राजावाडी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी वसतिगृहासाठी १५.२२ कोटी रुपयांची तरतूद

 

02:54 PM, Feb 04 IST
देवनार पशुवधगृहाच्या नूतनीकरणासाठी २० कोटी रुपयांची तरतूद

 

02:54 PM, Feb 04 IST
वांद्र्यातील भाभा रुग्णालयासाठी २८७ कोटी रुपयांची तरतूद

 

02:53 PM, Feb 04 IST
पुलांच्या उभारणीसाठी ७९९.६५ कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद

 

02:53 PM, Feb 04 IST
मुंबईचा महत्त्वाकांक्षी कोस्टल रोडच्या खर्चात २५ टक्क्यांची वाढ

 

02:52 PM, Feb 04 IST
गोरेगाव लिंक रोडची लांबी १२.२ किमीने वाढवणार

 

Advertisement
02:52 PM, Feb 04 IST
बेस्ट करीता स्वतंत्र अर्थसंकल्पात १५०० कोटी रुपयांची तरतूद

 

02:51 PM, Feb 04 IST
कोरोना व्हायरसपासून बचावासाठी कस्तुरबा रुग्णालयात आधुनिक यंत्रसामुग्रीसाठी २ कोटी रुपयांची तरतूद

 

‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा