Advertisement

मुंबई महापालिका अर्थसंकल्प २०२३-२४

SHARE

मुंबई महापालिकेच्या यावर्षीच्या बजेटमध्ये मुंबईकरांसाठी असेल कोणती गोड बातमी? मुंबईतल्या शाळांसाठी किती रकमेची तरतुद होणार? मुंबईला आणखी विकास प्रकल्प मिळणार का? मुंबई महापालिका बजेटचे महत्त्वाचे मुद्दे, वाचा लाईव्ह अपडेट्समध्ये...

LIVE UPDATES

12:39 PM, Feb 04 IST
मुंबईतील पाऊस आणि पूर अलर्ट प्रणाली

• पावसाळ्यातील पर्जन्यमानाची माहिती आणि पावसाचे अचूक मोजमापाची माहिती दर १५ मिनिटाला पालिकेकडून २८ ठिकाणांवरील दिली जाते. 

• यात आता आणखी ६० ठिकाणींवरील माहितीची भर पडणार. सोबतच पूर चेतावणी प्रणालीची क्षमता वाढविण्याची देखील शिफारस. अर्थसंकल्पात २.६४ कोटी रुपयांची तरतूद

12:38 PM, Feb 04 IST
बेस्टकरीता ३ हजार ईलेक्ट्रीक बसेस खरेदी करणार
12:37 PM, Feb 04 IST
पालिकेच्या मालकीच्या सार्वजनिक वाहनतळांमध्ये इलेक्ट्रीक वाहनांकरीता चार्जिंग स्टेशनची उभारणी होणार, खासगी कंपन्यांद्वारे उभारणी होणार आणि पालिकेची उत्पन्नात भागिदारी तत्वावर महसूल उभारणीचा प्रयत्न
12:32 PM, Feb 04 IST
शिक्षण विभागाचे संबंधित महत्त्वाचे प्रकल्पासाठी विशेष तरतूद

- शिक्षण विभाग अंतर्गत नवीन योजना व प्रकल्प
- बीएमसी शाळेतील मुख्याध्यापकांना नेतृत्व कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार
- बीएमसी शाळेतील विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास यावर अधिक भर दिला जाणार
- मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्या बदल्यांबाबत ऑनलाईन सॉफ्टवेअरची निर्मिती
- दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता साहित्य खरेदी केली जाणार
- बीएमसी शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा, बोलक्या संरक्षण भिंतीची निर्मिती, नाविन्यपूर्ण गणित व विज्ञान केंद्र उभारणी केली जाणार

12:31 PM, Feb 04 IST
पाणी पुरवठा प्रकल्प विभागासाठी 1376 कोटी. गेल्यावर्षी 887.88 कोटी

- आधुनिक तृतीय स्तर जल प्रक्रिया केंद्र. यात कुलाबा येथे मलनिस्सारण केंद्रातील मलजलाचे पाणी पिण्यायोग्य पाण्यामध्ये रुपांतरित करणार प्रतिदिन 12 दशलक्ष लिटर पाणी यासाठी 32 कोटी
- जलवाहन बोगद्याच्या कामासाठी 119.50 कोटी
- जलवाहिन्यांचे पुनर्वसन आणिपुनरस्थापना 136 कोटी

11:59 AM, Feb 04 IST
मुंबई अग्निशमन दलासाठी 227 कोटी


11:59 AM, Feb 04 IST
राणीच्या बागेसाठी 140 कोटींची तरतूद


11:58 AM, Feb 04 IST
मुंबईकरांना 32 ठिकाणी सार्वजनिक वाहनतळ


11:57 AM, Feb 04 IST
मुंबईकरांना महापालिकेकडून मोठा दिलासा

मुंबई मनपाकडून यंदा कोणतीही करवाढ नाही

11:54 AM, Feb 04 IST
BMC बजेट अंदाज


11:26 AM, Feb 04 IST
गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात 1,060 कोटी रुपयांची तरतूद
11:25 AM, Feb 04 IST
‘शाळाबाह्य’ मुलांच्या मोहिमेसाठी 10 लाख रुपयांची तरतूद
Advertisement
11:24 AM, Feb 04 IST
BMC ने एक पार्किंग अॅप विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.

11:19 AM, Feb 04 IST
2023-24 मध्ये BMC च्या मालकीच्या सार्वजनिक पार्किंग भागात इलेक्ट्रिक वाहनांसाठी अधिक चार्जिंग स्टेशन असतील असे बजेटमध्ये नमूद केले आहे.
11:17 AM, Feb 04 IST
दहिसर टोल नाका, मुलुंड चेक नाका, मानखुर्द, कला नगर आणि हाजी अली जंक्शन अशा गर्दीच्या भागात पाच एअर प्युरिफायर प्रस्तावित
11:16 AM, Feb 04 IST
2023-24 आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पीय अंदाज 52,619.07 कोटी रुपये प्रस्तावित आहे जो 2022-23 च्या अर्थसंकल्पीय अंदाजापेक्षा 14.52% ने 45,949.21 कोटीअधिक आहे.
11:15 AM, Feb 04 IST
बेस्टचे बजेट अंदाज

सार्वजनिक वाहतुकीचे महत्त्व लक्षात घेऊन, बेस्टला त्यांच्या कामकाजात मदत करण्यासाठी 2023-24 च्या अंदाजपत्रकात 800 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे.

11:14 AM, Feb 04 IST
मला आशा आहे की, भविष्यात BEST विविध मापदंडांमध्ये सुधारणा करून आणि संरचनात्मक सुधारणांद्वारे आणि BMC वरील सहाय्यता कमी करून लवकरच चांगली आर्थिक स्थिती गाठेल, असा उल्लेख महापालिका आयुक्तांचा अर्थसंकल्पात केला आहे.
Advertisement
11:13 AM, Feb 04 IST
2023-2024 साठी शिक्षणाचा अंदाजपत्रक मागील वर्षीच्या 3,370 कोटी रुपयांच्या तुलनेत किरकोळ कमी होऊन 3,347 कोटी रुपये झाला आहे.
11:12 AM, Feb 04 IST
रस्ते, स्ट्रॉम वॉटर ड्रेन आणि पाणी प्रकल्प यासारख्या शहराच्या पायाभूत सुविधांच्या सुधारणेसाठी विकास प्रकल्पांवर खर्च करणाऱ्या भांडवली खर्चासाठी बीएमसीने 27,247 कोटी रुपये दिले आहेत.

"पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भांडवली खर्च महसुलापेक्षा जास्त आहे," असे बीएमसीचे प्रमुख आयएस चहल यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले.

Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा