Advertisement

मृण्मयीनं केसरच्या भूमिकेत भरले हेरगिरीचे रंग


मृण्मयीनं केसरच्या भूमिकेत भरले हेरगिरीचे रंग
SHARES

कोणत्याही भूमिकेला योग्य न्याय देण्याचं कसब अंगी असलेल्या अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने आजवर बऱ्याच अवघड भूमिकाही अगदी सोप्या पद्धतीने सादर करत रसिकांची मनं जिंकली आहेत. हिच मृण्मयी आता लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘फर्जंद’ या आगामी सिनेमात एका कलावंतीणीच्या भूमिकेत दिसणार आहे.


चित्रपटाची कथा

कोंडाजी फर्जंदवर आधारित असलेल्या ‘फर्जंद’चित्रपटामध्ये मृण्मयीने स्वराज्यासाठी कार्य करणाऱ्या अशाच एका छुप्या सैनिकाची भूमिका साकारली आहे. या सिनेमात मृण्मयीने केसर नावाच्या एका कलावंतीणीची भूमिका साकारली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी हेरगिरी करणाऱ्या गुप्तहेर बहिर्जी नाईक यांच्यापर्यंत शत्रूंची खबरबात पोहचवण्याचं काम केसर करत असते. हा सिनेमा १ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला

या सिनेमासाठी मृण्मयीने १५ दिवस दररोज चार तास तलवारबाजीचा सराव केला. मृण्मयी सुंदर आहे, तसंच दर्जेदार अभिनेत्री आणि नर्तिकाही आहे, पण या सिनेमात तिचा लढवय्या बाणा पाहायला मिळणार आहे. सिनेमाच्या शेवटी तिच्यावर खूप छान फाईट सिक्वेन्स चित्रीत करण्यात आलं आहे. याशिवाय दिग्पालने या सिनेमात मृण्मयीवर भालजी पेंढारकरांच्या शैलीतील ‘राखू द्या ना मर्जी स्वारीची...’ ही घरंदाज लावणीही चित्रीत केली आहे.
- दिग्पाल लांजेकर, लेखक-दिग्दर्शक

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा