Advertisement

'दृष्टांत'मध्ये सर्व दृष्टिहीन कलाकार

अभिनेतेच नव्हे तर गायक, संगीतकार आणि डबिंग कलाकार देखील दृष्टिहीन असून या चित्रपटाचे भाग आहेत.

'दृष्टांत'मध्ये सर्व दृष्टिहीन कलाकार
SHARES

‘दृष्टांत’ सिनेमाच्या पोस्ट प्रोडक्शनचे काम वेगात सुरु आहे. चित्रपटातील कलाकार हे ख-या आयुष्यात दृष्टिहीन असून त्यांनी या चित्रपटामध्ये भूमिका साकारल्या आहेत.

हे भारतीय सिनेमाच्या दृष्टीनं अभिमानाची गोष्ट आहे. केवळ अभिनेतेच नव्हे तर गायक, संगीतकार आणि डबिंग कलाकार देखील दृष्टिहीन असून या चित्रपटाचे भाग आहेत.

अभिजित के. झांजल यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. सिनेमाचं संपूर्ण चित्रीकरण गोव्यामध्ये झालं आहे. मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणारा कलाकार अजिंक्य याभोवती चित्रपटाची मुख्य कथा आधारित आहे. या चित्रपटात बबिता, रतन आणि योगेश राव या कलाकारांच्या देखील महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

जीवनातील महत्त्व आणि सामाजिक संदेश देणारा चित्रपट आहे. चित्रपट निर्मात्यांनी हा चित्रपट दृष्टिहीन आणि ज्यांना ऐकू येत नाही अशा लोकांना बघता आणि ऐकता येईल याची विशेष काळजी घेतली आहे.

चित्रपट बनवण्यामागचा मुख्य उद्देश सर्वसामान्य लोकांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे आणि तसंच अवयव दान आणि सामाजिक दृष्ट्या कमी भाग्यवान व्यक्तीला मदत करणं हा आहे. बीएम प्रॉडक्शन्स आणि पोलराइड मीडिया निर्मित, त्रिपुर सिंग, तन्मय तेलंग आणि हर्षवर्धन हे चित्रपटाचे निर्माते आहेत.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा