Advertisement

मधुराच्या मधुर अदा पाहिल्या का?

‘जीवलगा’ या मालिकेमुळं पुन्हा लाइमलाईटमध्ये आलेल्या अभिनेत्री मधुरा देशपांडेनं नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. यात मधुराच्या मधूर अदा पहायला मिळतात.

मधुराच्या मधुर अदा पाहिल्या का?
SHARES

‘जीवलगा’ या मालिकेमुळं पुन्हा लाइमलाईटमध्ये आलेल्या अभिनेत्री मधुरा देशपांडेनं नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. यात मधुराच्या मधूर अदा पहायला मिळतात.

टेलिव्हीजन विश्वातील सर्वात ग्लॅमरस मालिका म्हणून ख्याती मिळवणाऱ्या ‘जीवलगा’ या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेनं अल्पावधीतच सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्रोमो आल्यापासूनच या मालिकेचे वेध सर्वांना लागले होते. स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर आणि सिद्धार्थ चांदेकर या मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या कलाकारांसोबत मधुराही या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे.

काही कलाकार फोटोशूटसाठी खास ओकेजनची वाट पहात नाहीत. मधुराही त्यांच्यासारखीच आहे. त्यामुळंच तिचे फोटो कृत्रिम न वाटता नैसर्गिक वाटतात. नुकत्याच केलेल्या फोटोशूटमध्येही तिचं नैसर्गिक सौंदर्य खुलून दिसतं. या फोटोशूटमधील काही फोटोही असेच आहेत. मधुराबाबत सांगायचं तर ‘जीवलगा’ या मालिकेपूर्वी ‘इथेच टाका तंबू’ या मालिकेतही तिनं काम केलं आहे.

‘अँड जरा हटके’ आणि ‘गुलाबजाम’ या मराठी चित्रपटांच्या जोडीला मधुरानं राणी मुखर्जीची मुख्य भूमिका असलेल्या ‘अय्या’ या हिंदी चित्रपटातही अभिनय केला आहे. या चित्रपटात तिनं साकारलेल्या कमलानं लक्ष वेधून घेतलं होतं. सध्या ती ‘पाहिले न मी तुला’ या आगामी मराठी चित्रपटाच्या कामात बिझी आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा