• 'एक सांगायचंय...' म्हणत प्रथमच एकत्र आले केके-राजेश्वरी
SHARE

रीअल लाईफमध्ये काही जोड्या कायमस्वरूपी टिकतात, तर काही तुटतात, पण रील लाईफमधील ज्या जोड्या प्रेक्षकांना भावतात, त्या पुन: पुन्हा रुपेरी पडद्यावर एकत्र येतात. यात काही नवीन जोड्याही जुळतात. ‘एक सांगायचंय…’ असं म्हणत के. के. मेनन आणि राजेश्वरी सचदेव या दोन कलाकारांची प्रथमच जोडी जमली आहे.

111111.jpeg

'ही' जोडी पहिल्यांदाच झळकणार

'एक सांगायचंय... UNSAID HARMONY’ हे आगामी मराठी चित्रपटाचं शीर्षक आहे. आणखी एक मराठी अभिनेता या चित्रपटाद्वारे अभिनयाकडून दिग्दर्शनाकडे वळला आहे. अभिनेता लोकेश विजय गुप्ते आता दिग्दर्शक म्हणून रसिकांच्या भेटीला येणार आहे. देवी सातेरी प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या तसंच लोकेशच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'एक सांगायचंय... UNSAID HARMONY’ या चित्रपटातच बॉलिवूडमधील के के मेनन आणि राजेश्वरी सचदेव ही जोडी पहिल्यांदाच मराठीत एकत्र झळकणार आहे.

या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं आहे. नातेसंबंधांबाबतची अत्यंत संवेदनशील कथा या चित्रपटात पहायला मिळणार आहे. १६ नोव्हेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या