Advertisement

... म्हणून पुष्कर जोगसाठी खास आहे 'वेल डन बेबी'

अभिनेता पुष्कर जोगनं सांगितलं की चित्रपट 'वेल डन बेबी' का आहे त्याच्यासाठी इतका खास!

... म्हणून पुष्कर जोगसाठी खास आहे 'वेल डन बेबी'
SHARES

‘वेल डन बेबी’ बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक ठरत आहे, ज्याला सर्वच स्तरांतून वाहवा मिळत आहे. या आगामी मराठी चित्रपटाची कथा आपल्याला प्रेम, आयुष्य यांच्यासोबत एका भावनात्मक रोलरकोस्टरमध्ये घेऊन जाते.

अभिनय, प्रोडक्शन आणि कॉन्सेप्टचा विचार करताना, या चित्रपटाविषयी बहुआयामी पुष्कर जोग याच्या मनात देखील याला एक विशेष स्थान आहे.  

पुष्करसाठी हा चित्रपट इतका खास का आहे, या विषयी बोलताना, पुष्कर (जो चित्रपटात मुख्य अभिनेता आदित्यची भूमिका साकारतो आहे) म्हणाला, “वेल डन बेबीच्या कथेला माझ्या मनात एक विशेष स्थान आहे.

मी यातील व्यक्तिरेखेला अगदी स्वाभाविकपणे सादर करू शकतो, मी त्याच्यासोबत स्वत:ला पूर्णपणे जोडून घेऊ शकतो, कारण मी हल्लीच बाबा झालो आहे. माझा स्वत:चा वैयक्तिक अनुभव डोळे उघडणारा होता ज्यामुळे मी या चित्रपटाची स्क्रिप्ट आणि आदित्यची व्यक्तिरेखा यांचा संबंध अनुभवू शकतो.

संपूर्ण प्रवास, एका जोडप्यामधील जटीलतेपासून, तो क्षण त्यांच्या आई बाबा बनण्यापर्यंतचा, खऱ्या अर्थानं जवळ येण्याचा आहे; गर्भावस्थेची प्रत्येक पायरी आपल्या आपल्यामध्येच एक आनंददायक एडवेंचर आहे. मला विश्वास आहे कि प्रेक्षक देखील या अंतहीन कथेला तितकेच खास समझून घेतील जितकी ती माझ्यासाठी आहे." 

‘वेल डन बेबी’ची कहाणी आधुनिक काळातील जोडप्याभोवती फिरत आहे, जे घटस्फोट घेणार आहेत. परंतु नशिबानं त्यांना आश्चर्यकारकरीत्या एका वळणावर आणून उभं केलं आहे.

प्रियंका तन्वर दिग्दर्शित आणि मर्मबंधा गव्हाणे लिखित, या चित्रपटात पुष्कर जोग, अमृता खानविलकर आणि वंदना गुप्ते मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

आनंद पंडित, मोहन नादर आणि पुष्कर जोग निर्मित आणि व्हिडीओ पॅलेसद्वारे सादर करण्यात येत असलेला हा चित्रपट भारतातील प्राईम सदस्य ९एप्रिल २०२१पासून अमेझॉन प्राईम व्हिडीओवर पाहू शकतील.हेही वाचा

संबंधित विषय
POLL

मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्सला हरवून सलग तिसरा विजय नोंदवणार का? काय वाटते? प्रतिक्रिया नोंदवा.
Submitting, please wait ...
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा