Advertisement

मराठमोळ्या मृण्मयीचं ‘एंड-काऊंटर’ करत बॉलिवूडमध्ये पदार्पण


मराठमोळ्या मृण्मयीचं ‘एंड-काऊंटर’ करत बॉलिवूडमध्ये पदार्पण
SHARES

सिनेमात काम करणं हे तरुणाईसाठी मोठं आकर्षण...तर बॉलिवूडमध्ये म्हणजेच हिंदी सिनेमात काम करणं हे तमाम भाषेतील कलाकरांचं स्वप्न. मराठी अभिनेत्री मृण्मयी कोलवालकर हिचं बॅालिवूडमध्ये काम करण्याचं स्वप्न अल्पावधीतच सत्यात अवतरलं आहे.

होय, मराठमोळी मृण्मयी कोलवालकर ही अभिनेत्री ए. जे. एंटरटेन्मेंट या निर्मिती संस्थेंतर्गत जतिन उपाध्याय, अलोक श्रीवास्तव यांचं दिग्दर्शन आणि निर्मितीखाली बनलेला ‘एंड-काऊंटर’ या हिंदी सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. दाक्षिणात्य आणि हिंदी सिनेमातील अभिनेता प्रशांत नारायणन या सिनेमात तिचा नायक आहे. सध्या या सिनेमाचं चित्रीकरण नाशिक जिल्ह्यातील निसर्गरम्य ठिकाणी सुरू आहे.


मृण्मयी म्हणते...

मूळ पुण्याच्या मृण्मयीने यापूर्वी पुण्यात राहून सौंदर्य स्पर्धेत विजेतेपद मिळवलं असून, मॉडेलिंग जगतात जम बसवला आहे. हिंदी सिनेमात ब्रेक मिळण्याबाबत मृण्मयी म्हणाली, सिनेमाचे दिग्दर्शक अलोक श्रीवास्तव पुण्यात एका मराठी सिनेमाच्या ऑडिशनसाठी आले होते. त्यांना एक मॉडर्न मुलगी हवी होती. त्यामुळे प्रथम त्यांनी ‘मिस मॅच’ या मराठी सिनेमासाठी माझी निवड केली.

या सिनेमानंतर ‘एंड-काऊंटर’ या हिंदी सिनेमाची आॅफरही मला दिली. या सिनेमात मी रेणू सहाय नावाची तरुण लेखिकेची भूमिका साकारत आहे. मॉडर्न विचारांची, स्वतंत्र शैली असलेली, नैतिकता जपणारी अशी ही नायिका आहे. आयुष्यात ज्या गोष्टी योग्य आहेच त्याच तिला करायला आवडतात.


सिनेमाकडून खूप अपेक्षा

‘एंड-काऊंटर’च्या पुर्वतयारीबाबत मृण्मयी म्हणते, चित्रीकरण सुरू करण्यापूर्वी अलोकसरांनी माझं वर्कशॉप घेतलं होतं. त्यामुळे अभिमन्यू सिंग, व्रिजेश हिरजी, अनुपम श्याम, उदय टिकेकर, एहसान कुरेशी, रणजीत, सत्यंवदा सिंग, सत्यशील नायक या बड्या कलाकरांसोबत काम करताना कधीही दडपण जाणवलं नाही. ‘एंड-काऊंटर’नंतर माझ्यासाठी हिंदीचे दरवाजे खऱ्या अर्थाने उघडणार असल्याने या सिनेमाकडून खूप अपेक्षा आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा