Advertisement

‘हॅशटॅग प्रेम’ नव्या युगातली प्रेम कहाणी

‘हॅशटॅग प्रेम’ या आगामी मराठी सिनेमाच्या माध्यमातून अशीच एक नवी कोरी प्रेमकहाणी रसिकांसमोर उलगडणार आहे.

‘हॅशटॅग प्रेम’ नव्या युगातली प्रेम कहाणी
SHARES

आकर्षण अद्याप तसूभरही कमी झालेलं नाही. याची जाणीव नव्यानं येणारे सिनेमे नेहमीच करून देत असतात. ‘हॅशटॅग प्रेम’ या आगामी मराठी सिनेमाच्या माध्यमातून अशीच एक नवी कोरी प्रेमकहाणी रसिकांसमोर उलगडणार आहे.

आजच्या सोशल मीडियाच्या “हॅशटॅग’’च्या जमान्यातील “प्रेम’’ प्रेक्षकांना या सिनेमात पहायला मिळणार आहे. निर्माते अनिल गोविंद पाटील यांनी “माऊली फिल्म प्रोडक्शन’’च्या बॅनरखाली बनवलेला हा सिनेमा वितरक समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी यांच्या “पिकल एंटरटेनमेंट’’च्या सहकार्याने सिनेरसिकांसमोर प्रस्तुत केला जाणार आहे. निर्माते अनिल गोविंद पाटील यांनी ‘हॅशटॅग प्रेम’च्या माध्यमातून निर्मितीक्षेत्रात पदार्पण केलं आहे. दिग्दर्शक राजेश जाधव यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा सिनेमा सर्वांर्थानं आजच्या पिढीचं प्रतिनिधीत्व करणारा असून, तरूणाईला मार्गदर्शक ठरणारा आहेच, परंतु एक सुज्ञ विचार देणाराही आहे. ‘हॅशटॅग प्रेम’ हा सिनेमा प्रेक्षकांचं सर्वतोपरी मनोरंजन करेलच, पण त्यासोबतच अंडरकरंट एक मेसेजही देणारा असल्यानं प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल असा ठाम विश्वास निर्माते अनिल गोविंद पाटील यांनी व्यक्त केला आहे. ब-याच वर्षांपासून मराठी सिनेवितरणातील अग्रगण्य नाव बनलेल्या “पिकल एंटरटेनमेंट’’ने आजवरच्या काळात ब-याच आशयघन सिनेमांचे यशस्वी वितरण केले असून आता निर्मात्यांच्या साथीने सिनेमा प्रदर्शित करण्याच्या वाटेवर नवं पाऊल ठेवलं आहे. आम्ही नेहमीच रसिकांची आवड-निवड जोपासत आणि कलेचा उचित सन्मान राखत रसिकांचं मनोरंजन केलं असून, ‘हॅशटॅग प्रेम’ हा आगामी सिनेमा हाच आमचा वसा जोपासणारा असल्याचं मत समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी यांनी व्यक्त केलं आहे.

या सिनेमात प्रेक्षकांना एक नवं कोरं प्रेमी युगुल पहायला मिळणार आहे. ‘हॅशटॅग प्रेम’मध्ये मिताली मयेकर आणि सुयश टिळक मुख्य भूमिकेत असून, त्यांची अनोखी केमिस्ट्री या सिनेमाचं आकर्षण ठरणार आहे. आजवर कधीही समोर न आलेलं कथानक, मातब्बर कलाकारांचा कसदार अभिनिय, सुमधूर गीत-संगीताची संगीतमय मेजवानी, नयनरम्य लोकेशन्समधील नेत्रसुखद निसर्गसौंदर्य, दर्जेदार निर्मितीमूल्ये आणि मनमोहक सादरीकरण हे या सिनेमाचे प्लस पॉईंट आहेत. ‘हॅशटॅग प्रेम’ची कथा-पटकथा निखिल कटारे यांनी लिहिली असून आघाडीचे संगीतकार प्रविण कुवर यांनी या सिनेमातील गीतांना सहजसुंदर संगीत दिले आहे. नृत्यदिग्दर्शन आशिष पाटील यांनी केलं असून कलादिग्दर्शन केशव ठाकूर यांचं आहे. सिनेमॅटोग्राफर राजा फडतरे यांच्या नजरेतून हा सिनेमा प्रेक्षकांना पहायला मिळणार असून महेश भारंबे यांनी कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी उत्तमरित्या सांभाळली आहे. ‘हॅशटॅग प्रेम’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा